LIVE UPDATES

शुभम गावडे यांचा SUDLIFE तर्फे विशेष सत्कार

कसई-दोडामार्ग येथे उत्कृष्ट विक्री व ग्राहकसेवेबद्दल गौरव
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 22, 2026 01:32 PM
views 47  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

दोडामार्ग : स्टार युनियन दाय-इची लाईफ इन्शुरन्स (SUDLIFE) च्या वतीने कासई-दोडामार्ग परिसरात उत्कृष्ट विक्री कामगिरी आणि दर्जेदार ग्राहकसेवा दिल्याबद्दल शुभम गावडे यांचा झोनल कार्यालयाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

बँक ऑफ इंडिया, कसई-दोडामार्ग शाखेमध्ये SUDLIFE च्या व्यवसायवृद्धीसाठी आणि ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी श्री. गावडे यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला.शुभम गावडे हे केवळ विमा विक्रीच नव्हे, तर ग्राहकांच्या अडचणी समजून घेऊन लोकांची सेवा देखील अत्यंत प्रामाणिकपणे आणि व्यवस्थितपणे करतात, अशी भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

या सत्कार समारंभाप्रसंगी SUDLIFE चे एरिया मॅनेजरसमीर शिंदे, बँक ऑफ इंडिया, कासई-दोडामार्ग शाखेचे सिनियर ब्रँच मॅनेजर पवन कुलकर्णी, SUDLIFE चे सेल्स ऑफिसर इफ्तेखार पटेल आणि नंदकिशोर करनम उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी शुभम गावडे यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करून अभिनंदन केले व भविष्यातही त्यांनी अशीच उल्लेखनीय कामगिरी करून SUDLIFE च्या प्रगतीत मोलाचे योगदान द्यावे, अशा शुभेच्छा दिल्या.