LIVE UPDATES

पोलीस स्मिता माने मृत्यूप्रकरणी नवीन माहिती उघड

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 21, 2026 06:48 PM
views 186  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

कणकवली : कणकवली पोलीस ठाण्याच्या हवालदार सौ. स्मिता माने यांच्या मृत्यू प्रकरणी तपास करणाऱ्या कुडाळ पोलिसांनी कणकवली ते बिडवाडी मार्गावरील सीसीटीव्ही तपासले. यामध्ये स्मिता या एसटी बसने एकट्याच बिडवाडी येथे गेल्या, अशी बाब उघड झाली आहे.

स्मिता माने या ९ ऑक्टोबरला सकाळच्या सुमारास कलमठ - नाडकर्णीनगर येथील राहत्या घरातून बेपत्ता झाल्या होत्या. तर त्यांचा मृतदेह ११ ऑक्टोबरला बिडवाडी - हुंबरणे येथील जंगलात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला होता. याबाबत स्मिता यांची बहीण रेश्मा जाधव यांनी फिर्याद दिली होती. स्मिता यांचे पती सचिन माने यांच्या जाचाला कंटाळून स्मिता यांनी आत्महत्या केली असावी किंवा सचिन यांनीच स्मिता यांचा घातपात केला असावा, असे तक्रारीत म्हटले होते. त्यानुसार तपास करणाऱ्या कुडाळ पोलिसांनी सचिन यांना अटक केली होती. पोलीस कोठडीनंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे.

दरम्यान कुडाळ पोलिसांनी कणकवली ते बिडवाडी मार्गावरील सीसीटीव्ही तपासले. यात दोन सीसीटीव्हींमध्ये स्मिता माने आढळून आल्या. त्या एसटी बसमध्ये चढताना दिसल्या. सदरची बस कणकवली ते बिडवाडी जाणारी असून स्मिता यांचा मृतदेह आढळला त्या घटनास्थळानजीकच्या एका मंदिराकडून माघारी फिरते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सदर बसच्या वाहकाकडे चौकशी केली. वाहकाने देखील स्मिता माने बसमध्ये बसल्या होत्या, असे स्पष्ट केल्याचे कुडाळ पोलिसांनी सांगितले आहे.

स्मिता यांचा मृतदेह सापडला तेव्हा गाऊनच्या खिशात ४७० रुपये आढळले होते. याचा अर्थ स्मिता घरातून ५०० रुपये घेऊन बाहेर पडल्या असाव्यात. त्यांनी बसमध्ये तिकीट काढले व उर्वरित पैसे खिशात आढळले, असेही पोलिसांनी सांगितले.

आत्महत्याच असल्याचा अंदाज 

स्मिता माने या एसटी बसने बिडवाडीच्या जंगलात गेल्याची बाब उघड झाल्यामुळे हा घातपात नव्हे तर आत्महत्या असल्याचा अंदाज आता पोलिसांनी वर्तविला आहे. मात्र शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे. त्या अहवालानंतरच खरी बाब उघड होईल, असेही पोलिसांनी सांगितले.


ताजी बातमी

View all

#kokansadlive#news update#konkan update#breaking news
आज धडा नव्हता पुस्तकातला, तर होता पाणी वाचविण्याचा
October 21, 2026
#kokansadlive#news update#konkan update#breaking news
हिंदू खाटीक समाजातील नागरिकांसाठी स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना
October 21, 2026
#kokansadlive#news update#konkan update#breaking news
आरोग्यसेवा बळकटीकरणासाठी पारुल युनिव्हर्सिटी, गोवा DHS एकत्र
October 21, 2026
#kokansadlive#news update#konkan update#breaking news
माहिती हक्क कायद्याचे सखोल विश्लेषण आता मराठीतून
October 21, 2026
संबंधित बातम्या

View all

घराचे कुलूप तोडून अतिक्रमण केल्याच्या वादातून मारहाण
October 19, 2026
Kudal police investigation into the Damini Kiran Palav murder case in Sindhudurg.
Damini Palav Murder Case : दामिनी पालव खून प्रकरणात महत्त्वाचा पुरावा हाती
October 19, 2026
 DRI and Bihar STF seize 3 kg of charas in Muzaffarpur drug smuggling case
Muzaffarpur Drug Bust : नेपाळमधून महाराष्ट्रात होणार होती ३ कोटींच्या चरसची तस्करी
October 19, 2026
Tiger Shroff firing case accused arrested in Kota Rajasthan
Tiger Shroff Firing Case : टायगर श्रॉफवरील गोळीबार प्रकरणात राजस्थानमधून तिन्ही आरोपींना अटक
October 19, 2026