LIVE UPDATES

लोरे येथे आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर उत्साहात

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 22, 2026 12:40 PM
views 24  views
#kokansadlive#news update#konkan update#breaking news

कणकवली :  कणकवली लोरे, येथे ‘माझं गाव – आरोग्यसंपन्न गाव’ या उपक्रमांतर्गत लोरे येथे आयोजित करण्यात आलेले आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिर उत्साहात आणि व्यवस्थितरीत्या संपन्न झाले. या शिबिराच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना आरोग्य तपासणी व आरोग्यविषयक मार्गदर्शनाचा लाभ मिळाला.

लोरे नं.1 गावातील एकूण 50 महिलांची आरोग्य तपासणी झाली.तसेच किशोरवयीन मुलींनाही मार्गदर्शन करण्यात आले या शिबिरात गुरुकृपा हॉस्पिटल, कणकवली येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शमिता बिरमोळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. नागरिकांना आरोग्याबाबत जागरूक करणे, नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून देणे आणि निरोगी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. 17 ऑक्टोबर रोजी झालेल्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली. गावातील नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

‘सुदृढ कुटुंब, आरोग्यसंपन्न गाव’ हे ध्येय साध्य करण्यासाठी अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करणे गरजेचे आहे. सरपंच अजय तुळशीदास रावराणे यांच्या उपस्थितीत हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले. सदर शिबिरास उपसरपंच रसिका राणे, ग्रामपंचायत अधिकारी राकेश गोवळकर, ग्रामपंचायत सदस्य,आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आदी उपस्थित होते.