LIVE UPDATES

Smita Mane Case : पोलीस शिपाई सचिन मानेला सशर्त जामीन मंजूर

महिला पोलीस स्‍मिता माने मृत्‍यू प्रकरण
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 07, 2026 06:11 PM
views 200  views
Kankavli court grants conditional bail to police constable Sachin Mane in connection with the death of his wife Smita Mane.

कणकवली : पोलीस हवालदार स्मिता सचिन माने हीच्या चारित्र्यावरून संशय घेऊन शारिरीक व मानसिक छळ करत पट्ट्याने मारहाण करत आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या संशयित पोलीस कॉन्स्टेबल सचिन अशोक माने याला अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस. एस. इंदलकर यांनी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामिन मंजूर केला. आरोपीच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मयत स्मिता माने हीची बहिण रेश्मा जाधव हिने दिलेल्या फिर्यादीनुसार स्मिता व सचिन यांचे लग्न दहा वर्षापुर्वी झाले होते. लग्न झाल्यापासून स्मिता हीला पती सचिन कोणत्या ना कोणत्या कारणावरून मारहाण करत असे. अलिकडेच एक महिन्यापासून सचिन हा चारित्र्यावर संशय घेऊन लागला होता.

८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री उभयतांचे भांडण झाले व फिर्यादीला फोन आला. त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी सचिन याने सकाळी ७ ते ८ च्या दरम्यान स्मिता बेपत्ता झाल्याचे फिर्यादीला कळविले. तीचे बडिल, भावजी व पती यांनी कोल्हापूर, खेड येथे शोध घेतला. त्यावेळी फिर्यादी घरी गेली असता तीला घरामध्ये लांब केस पडलेले दिसले. त्यांचा मुलगा सार्थक याने वडिलांनी आईला पट्टचाने मारल्याचे सांगितले.

दरम्यान, संशयित आरोपीने पत्नीचे अपहरण झाल्याची खबरही पोलीस स्टेशनला दिली होती. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी तीचा मृतदेह बिडवाडी-हुंबरणे येथे काजू बागेत गळफास लावलेल्या स्थितीत आढळला. फिर्यादीने संशयित आरोपीच्या छळाला कंटाळून गळफास घेतला असावा किंवा तीचा घातपात झाला असावा अशी फिर्यादी दिली होती. याबाबत भा.न्या.सं. १०८, ११५ (२), ११८ (१) नुसार गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार संशयित आरोपीला अटक करण्यात आली होती.

अटकेतील तपासात मयत ही एसटी बसने हुंबरणे येथे गेल्याचे निष्पन्न झाले होते. पोलीस कोठडी संपल्यानंतर संशयित आरोपीतर्फे जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला असता सुनावणीअंती न्यायालयाने सरकारी पक्षाच्या पुराव्यात ढवळाढवळ करू नये, तपासात सहकार्य करावे, पोलीस खात्यात नोकरी करत असल्याचा गैरफाफदा घेऊ नये आदी अटी घातल्या आहेत.


ताजी बातमी

View all

Eco-friendly Diwali Akash Kandil made from natural areca nut tree sheaths by Sunil Mulik from Dhakore village in Sindhudurg.
Eco-Friendly Diwali Lantern : ‘सुपारी’चे झाड...उचलला ‘कलात्‍मकतेचा विडा’
November 07, 2026
Sawantwadi police recover 12 tola stolen gold jewellery from Karnataka in a gold theft case involving an accused husband-wife duo.
Sawantwadi Gold Theft Case : सावंतवाडीत १२ तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी उघड
November 07, 2026
कबड्डीपटूंची निवड गुणवत्तेच्या आधारेच होणार : ॲड. अजित गोगटे
November 07, 2026
MSRTC Ratnagiri Division announces 26 additional daily bus services for passengers during the Diwali festival.
Ratnagiri Diwali Special ST Buses : दिवाळीसाठी एसटीच्या रत्नागिरी विभागाकडून २६ जादा फेऱ्या
November 07, 2026
संबंधित बातम्या

View all

Sawantwadi police recover 12 tola stolen gold jewellery from Karnataka in a gold theft case involving an accused husband-wife duo.
Sawantwadi Gold Theft Case : सावंतवाडीत १२ तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी उघड
November 07, 2026
Food and Drug Administration officials seize 98 kg of mawa in Kudal during Diwali food safety inspection in Sindhudurg.
Sindhudurg Food Safety Raid : दिवाळीच्या फराळावर अन्न प्रशासनाचा छापा; सिंधुदुर्गात ४३ हजारांचा संशयास्पद साठा जप्त
November 07, 2026
Land dispute case in Malewad Naikwadi, Sawantwadi, 13 people booked by police
Crime News : मळेवाडमध्ये जमिनीच्या वादातून राडा
November 07, 2026
मासळी वाहतूक करणाऱ्या सहा वाहनांवर पोलिसांची कारवाई
November 06, 2026