
सावंतवाडी : तालुक्यातील मळेवाड नाईकवाडी येथे जमिनीच्या जुन्या वादातून दोन गटांत झालेल्या वादानंतर एकाच कुटुंबातील १३ जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमेश सीताराम कारूडेकर (वय ६५, रा. मळेवाड, नाईकवाडी) आणि विरोधक यांच्यात मळेवाड येथील जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद सुरू आहेत. त्याविरोधात तहसीलदार यांच्याकडे दावा दाखल आहे.
यातच घराच्या गेटजवळ येऊन गोंधळ, हुल्लडबाजी, घराचे गेट व मोबाईलचे नुकसान केले तसेच अंगणात घुसून मारहाण केली अशी तक्रार फिर्यादी यांनी दाखल केली आहे. तसेच मोबाईलवर घटनेचे शूटिंग करत असताना चुलत सुनेचा मोबाईल काढून फेकून देण्यात आला व तिलाही मारहाण करण्यात आली अशी तक्रार दिली आहे. तर, घराशेजारील दुकानदारांनाही दुकाने उघडल्यास तोडफोड करण्याची धमकी देण्यात आल्याची फिर्याद पोलिसांकडे नोंदविली असल्याची माहिती दिली.
यावरून नंदकिशोर नाईक, दाजी नाईक, लक्ष्मण नाईक, अमोल नाईक, आत्माराम नाईक, तुषार नाईक, गुरुप्रसाद नाईक, पद्माकर नाईक, अमित नाईक, सविता नाईक, प्राजक्ता नाईक, इंदू नाईक, हर्षा नाईक यांच्याविरोधा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. अरवारी हे करत आहेत.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








