LIVE UPDATES

crime news : कुडाळ नगरपंचायतीचे स्वच्छता निरीक्षक 'एसीबी'च्या जाळ्यात

ना हरकत दाखल्यासाठी १,२०० रुपयांची चांदीची अंगठीची मागणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 04, 2026 05:55 PM
views 1748  views

कुडाळ : व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला 'ना हरकत दाखला' (NOC) देण्यासाठी १,२०० रुपये किमतीची चांदीची अंगठी लाच म्हणून स्वीकारणाऱ्या कुडाळ नगरपंचायतीतील स्वच्छता निरीक्षक संशयित पांडुरंग वासुदेव नाटेकर (वर्ग ३) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून ताब्यात घेतले आहे.

४२ वर्षीय तक्रारदाराने 'पदमगड ज्वेलर्स' नावाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी नगरपंचायतीत अर्ज केला होता. हा दाखला देण्याच्या मोबदल्यात स्वच्छता निरीक्षक संशयित नाटेकर यांनी १,२०० रुपये किमतीची नवीन खडा असलेली चांदीची अंगठी मागितली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर २७ ऑगस्ट २०२६ रोजी पंचांसमक्ष केलेल्या पडताळणीत संशयित नाटेकर यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.

४ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी २:३० वाजता नगरपंचायत कार्यालयात रचलेल्या सापळ्यात तक्रारदाराकडून अंगठी स्वीकारताच आरोपीला संशय आला. वस्तूची मागणी केल्यानंतर संशय आल्याने संशयित नाटेकर यांनी प्रतिसाद देणे थांबवले. मात्र, एसीबी पथकाच्या शिताफीच्या कारवाईने आरोपीला रंगे हात पकडण्यात यश मिळवले.

आरोपीला वस्तू देताच खुणा करण्याची सूचना दिली होती. ते संकेत मिळताच एसीबी पथक दाखल झाले. संशयिताने स्वतःला वाचवण्यासाठी अंगठी लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या हातावर अँथ्रोसिन पावडर स्पष्ट दिसून आल्याने पथकाने संशयिताला तत्काळ ताब्यात घेतले. संशयित पांडुरंग नाटेकर यांच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारणा २०१८) चे कलम ७ सह भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २३८ (पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न) अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे व सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग युनिटच्या पोलीस उपअधीक्षक संगीता पाटील, सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक दीपक माळी आणि त्यांच्या पथकाने केली.

शासकीय कामासाठी कोणत्याही लोकसेवकाने लाच मागितल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्ग कार्यालय (फोन: ०२३६२-२२२२८९ / व्हॉट्सॲप: ९९२२८९१०६४) किंवा टोल-फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधावा.


ताजी बातमी

View all

सिंधुदुर्ग विश्वासार्हतेचा 'हाय क्रेडिट स्कोअर'
October 25, 2026
सिंधुदुर्गात प्रथमच सावंतवाडीतील औदुंबर स्वामी मंदिरात रामसेतू शिळेचे दर्शन
October 25, 2026
सावंतवाडीचे लेखक दीपक पटेकर यांना सर्वोत्कृष्ट स्तंभलेखन पुरस्कार
October 25, 2026
बांबर्डे येथील शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण पाचव्या दिवशीही सुरू
October 25, 2026
संबंधित बातम्या

View all

Kudal Talathi Bribe Case : पिंगुळीचे तलाठी जितेंद्र खेताडे यांना जामीन मंजूर
October 24, 2026
Tiger Shroff Car Firing Case : टायगर श्रॉफच्या कारवरील गोळीबार प्रकरणाला नवे वळण
October 24, 2026
Ratnagiri Murder Case : वर्ष उलटूनही रायपाटण येथील वृद्ध महिलेच्या हत्येचे गूढ कायम
October 24, 2026
Chiplun Special Court verdict in Guhagar teacher POCSO case
चिमुकलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी शिक्षकाला जन्मठेप
October 24, 2026