LIVE UPDATES

चिमुकलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी शिक्षकाला जन्मठेप

चिपळूण विशेष न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; सरकारी पक्षाच्या भक्कम युक्तिवादाला यश
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 24, 2026 03:05 PM
views 163  views
Chiplun Special Court verdict in Guhagar teacher POCSO case

चिपळूण : गुहागर तालुक्यातील एका मराठी शाळेत दुसरीत शिकणाऱ्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी शिक्षक उदय नामदेव वेल्हाळ याला चिपळूण येथील विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश डी. बी. म्हाळलकर यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी अभियोक्ता पुष्पराज शशिकांत शेट्ये यांनी प्रभावी बाजू मांडली.

मार्च २०२० मध्ये गुहागर तालुक्यातील एका मराठी शाळेत दुसरीत शिकणाऱ्या बालिकेला शिकवण्यासाठी आरोपी उदय वेल्हाळ याची नियुक्ती झाली होती. ७ मार्च २०२० रोजी पीडित बालिका घरी परतल्यानंतर ती लंगडत चालत असल्याचे तिच्या आईच्या निदर्शनास आले. आईने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, आरोपी शिक्षकाने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे बालिकेने सांगितले. त्यानंतर आईने गुहागर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६(क) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास केला. तपासाअंती दोषारोपपत्र चिपळूण न्यायालयात सादर करण्यात आले. खटल्याची सुनावणी सुरू असतानाच दुर्दैवाने पीडित बालिकेच्या आईचे निधन झाले. मात्र, सरकारी अभियोक्ता पुष्पराज शेट्ये आणि गुहागर पोलिसांनी सरकारी पक्षाची बाजू ठामपणे मांडली.

खटल्यादरम्यान सरकारी पक्षातर्फे एकूण १० साक्षीदार तपासण्यात आले. विशेष सरकारी वकील पुष्पराज शेट्ये यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी उदय नामदेव वेल्हाळ याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. चिमुकलीवरील गंभीर अत्याचारप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या या निकालामुळे बालकांवरील लैंगिक गुन्ह्यांच्या प्रकरणांत कठोर शिक्षेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.


ताजी बातमी

View all

MNS district president Adv. Anil Kesarkar raises concerns over the audit report and alleged irregularities in the Sawantwadi water supply project.
Sawantwadi News : ५७ कोटींच्या नळपाणी योजनेचा थर्ड पार्टी ऑडिट रिपोर्ट संशयास्पद
October 24, 2026
Ratnagiri Murder Case : वर्ष उलटूनही रायपाटण येथील वृद्ध महिलेच्या हत्येचे गूढ कायम
October 24, 2026
MLA Bhaskar Jadhav reviews compensation and rehabilitation work for Yelondewadi Dam project-affected families
Yelondewadi Dam : येलोंदेवाडी धरणग्रस्तांना ९५ कोटींचा मोबदला मिळवून दिला
October 24, 2026
India Women aim to secure a 2-0 series lead against Zimbabwe Women in the second ODI in Vadodara.
India vs Zimbabwe Women 2nd ODI : मालिकाविजयासाठी भारतीय महिला संघ सज्ज
October 24, 2026
संबंधित बातम्या

View all

Ratnagiri Murder Case : वर्ष उलटूनही रायपाटण येथील वृद्ध महिलेच्या हत्येचे गूढ कायम
October 24, 2026
Damini Palav Murder Case : संशयित साहिल धुरीला आणखी चार दिवसांची पोलीस कोठडी
October 24, 2026
Kudal Talathi Bribe Case : सातबारा नोंदीसाठी ५ हजारांची लाच मागितली
October 23, 2026
 Rajapur House Burglary News
Rajapur house burglary : ओणी कोंडिवळेत बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास
October 23, 2026