LIVE UPDATES

बांबर्डे येथील शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण पाचव्या दिवशीही सुरू

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 25, 2026 06:46 PM
views 18  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुका हत्तीमुक्त करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांवर लावण्यात आलेल्या जाचक अटी रद्द कराव्यात, शेतीच्या नुकसानीच्या पंचनाम्यात झालेल्या छेडछाडीची चौकशी करावी आणि संबंधित वन अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी हेवाळे-बांबर्डे येथील शेतकऱ्यांनी पुकारलेले बेमुदत उपोषण पाचव्या दिवशीही सुरू होते. 

जंगली हत्तींकडून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. वारंवार होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले असून, नुकसान भरपाईच्या पंचनाम्यांमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप करत विविध मागण्यांसाठी बांबर्डे येथील दौलत राणे, सिद्धेश राणे व मदन राणे यांनी येथील वनविभागाच्या कार्यालयासमोर बुधवारपासून बेमुदत उपोषणास सुरुवात केली.

पाचव्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख संजय गवस, नगरसेवक चंदन गावकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) उपजिल्हाप्रमुख संदीप गवस, स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय देसाई, शिवसेना (ठाकरे गट) महिला तालुका संघटक जेनिफर लोबो, संदेश राणे यांच्यासह विविध क्षेत्रांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविला.

शेतकऱ्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून त्यांना न्याय द्यावा, जंगली हत्तींच्या उपद्रवावर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात आणि नुकसानभरपाई प्रक्रियेतील अनियमिततेची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी यावेळी पाठिंबा देणाऱ्यांकडून करण्यात येत आहे.


ताजी बातमी

View all

भाजयुमोतर्फे सावंतवाडीत भव्य बॉडी बिल्डिंग, नरकासुर स्पर्धा
October 25, 2026
कुणकेश्वर हायस्कूलच्या सार्थक घाडीची ज्युदो स्पर्धेत चमकदार कामगिरी
October 25, 2026
देवगडमध्ये अवैध पर्ससीन मासेमारीवर मत्स्य विभागाची कारवाई
October 25, 2026
मुंबई-गोवा महामार्गावर चालत्या डंपरला भीषण आग
October 25, 2026
संबंधित बातम्या

View all

भाजयुमोतर्फे सावंतवाडीत भव्य बॉडी बिल्डिंग, नरकासुर स्पर्धा
October 25, 2026
सिंधुदुर्ग विश्वासार्हतेचा 'हाय क्रेडिट स्कोअर'
October 25, 2026
सिंधुदुर्गात प्रथमच सावंतवाडीतील औदुंबर स्वामी मंदिरात रामसेतू शिळेचे दर्शन
October 25, 2026
सावंतवाडीचे लेखक दीपक पटेकर यांना सर्वोत्कृष्ट स्तंभलेखन पुरस्कार
October 25, 2026