LIVE UPDATES

सिंधुदुर्ग विश्वासार्हतेचा 'हाय क्रेडिट स्कोअर'

मनीष दळवींच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेची गतिमान घोडदौड ; थेट राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 25, 2026 07:23 PM
views 29  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा २०२२ मध्ये स्वीकारल्यानंतर अध्यक्ष मनीष दळवी यांच्या नेतृत्वाखाली बँकेने विकासाची नवी दिशा पकडली आहे. आर्थिक व्यवहारातील वाढ, नफ्यातील लक्षणीय सुधारणा, ठेवींचा विस्तार, कर्जवाटपाला मिळालेली गती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार या सर्वच बाबतीत बँकेने भरीव कामगिरी नोंदवली आहे. या आर्थिक वाटचालीसोबतच राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या विविध पुरस्कारांनी बँकेच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब केले आहे.

बँकेचा कारभार केवळ आर्थिक व्यवहारांपुरता मर्यादित न ठेवता बदलत्या बँकिंग व्यवस्थेच्या गरजेनुसार तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावरही भर देण्यात आला. डिजिटल पेमेंट सुविधा, कोअर बँकिंग प्रणाली, रिटेल बँकिंगमधील तंत्रज्ञानाची अंमलबजावणी आणि ग्राहकाभिमुख बँकिंग सेवा यामुळे जिल्हा बँकेने आधुनिक बँकिंगच्या दिशेने आपली वाटचाल अधिक मजबूत केली आहे. मनीष दळवी यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात बँकेच्या विविध उपक्रमांची दखल घेत अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी बँकेचा गौरव करण्यात आला. यामध्ये तांत्रिक प्रगती, पेमेंट सुविधा आणि सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीचा समावेश आहे.

FCBA २०२२ पुरस्कार अंतर्गत सर्वोत्तम पेमेंट उपक्रम विभागातील पुरस्कार बँकेला मिळाला आहे. नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स आणि बँकिंग फ्रंटियर्स यांच्या माध्यमातून हा सन्मान मिळाल्याने बँकेच्या डिजिटल आणि पेमेंट क्षेत्रातील वाटचालीची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. याशिवाय बेस्ट कोअर बँकिंग सिस्टीम पुरस्काराने बँकेच्या तांत्रिक कार्यक्षमतेचा गौरव करण्यात आला.

आधुनिक बँकिंगमध्ये कोअर बँकिंग प्रणालीला असलेले महत्त्व लक्षात घेता हा पुरस्कार बँकेच्या तंत्रज्ञानाधारित कार्यपद्धतीची महत्त्वपूर्ण पावती मानली जात आहे. आयकॉनिक लीडरशिप अवॉर्ड २०२४ अंतर्गत रिटेल बँकिंगमध्ये उत्कृष्ट तंत्रज्ञान अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार. ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बँकिंग सेवा अधिक सक्षम करण्याच्या प्रयत्नांना या पुरस्कारामुळे अधोरेखित करण्यात आले.

बँकेच्या सहकार क्षेत्रातील कामगिरीचीही विविध पुरस्कारांच्या माध्यमातून दखल घेण्यात आली आहे. कै. वैकुंठ मेहता उत्कृष्ट सहकारी बँक पुरस्कार २०२२-२३ तसेच २०२३-२४. याशिवाय बँको पुरस्कार २०२२ ते २०२४ या कालावधीत सलग तीन वेळा पुरस्कार मिळाला आहे. बँकेच्या कामगिरीमुळे एकूण व्यवसायात झालेली वाढ, नफ्यातील सुधारणा, ठेवींच्या विस्तारासोबत कर्जवाटपात झालेली वाढ आणि ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या आधुनिक सेवा यामुळे बँकेच्या कार्यपद्धतीत झालेला बदल अधोरेखित होतो.

विशेषतः स्थानिक गरजा आणि सहकाराची मूलभूत भूमिका कायम ठेवत आधुनिक बँकिंग तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचा प्रयत्न मनीष दळवी यांच्या नेतृत्वाखाली बँकेने केला आहे. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील ग्राहकांना अधिक सुलभ, वेगवान आणि आधुनिक बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने बँकेने दमदार वाटचाल केली आहे. आर्थिक सक्षमतेसोबत तंत्रज्ञानाची जोड आणि सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणाऱ्या बँकिंग सेवांमुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने सहकार क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख अधिक भक्कम केली आहे.


ताजी बातमी

View all

भाजयुमोतर्फे सावंतवाडीत भव्य बॉडी बिल्डिंग, नरकासुर स्पर्धा
October 25, 2026
कुणकेश्वर हायस्कूलच्या सार्थक घाडीची ज्युदो स्पर्धेत चमकदार कामगिरी
October 25, 2026
देवगडमध्ये अवैध पर्ससीन मासेमारीवर मत्स्य विभागाची कारवाई
October 25, 2026
मुंबई-गोवा महामार्गावर चालत्या डंपरला भीषण आग
October 25, 2026
संबंधित बातम्या

View all

भाजयुमोतर्फे सावंतवाडीत भव्य बॉडी बिल्डिंग, नरकासुर स्पर्धा
October 25, 2026
सिंधुदुर्गात प्रथमच सावंतवाडीतील औदुंबर स्वामी मंदिरात रामसेतू शिळेचे दर्शन
October 25, 2026
सावंतवाडीचे लेखक दीपक पटेकर यांना सर्वोत्कृष्ट स्तंभलेखन पुरस्कार
October 25, 2026
बांबर्डे येथील शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण पाचव्या दिवशीही सुरू
October 25, 2026