LIVE UPDATES

वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचा हार हिसकावला

१ लाख ८० हजारांचा ऐवज लंपास : अलोरे - शिरगांव पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 25, 2026 03:15 PM
views 88  views

चिपळूण : तालुक्यातील पेढांबे (विठ्ठलवाडी) येथे राहत्या घरात घुसून एका अज्ञात व्यक्तीने वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचा हार हिसकावून चोरून नेल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. या घटनेत तीन तोळे वजनाचा आणि अंदाजे १ लाख ८० हजार रुपये किमतीचा सोन्याचा हार चोरीस गेला आहे.

याप्रकरणी प्रदीप वसंत शिंदे (वय ४५, रा. पेढांबे, विठ्ठलवाडी, ता. चिपळूण) यांनी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या आई शेवंती वसंत शिंदे यांच्या गळ्यातील सोन्याचा हार अज्ञात व्यक्तीने हिसकावून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी २३ नोव्हेंबर २०२६ रोजी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०४ तसेच फिर्यादीत नमूद कलम ३९२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहत्या घरातूनच सोन्याचा हार हिसकावून नेल्याने पेढांबे परिसरात या घटनेची चर्चा सुरू झाली आहे.


ताजी बातमी

View all

Artists performing at the ninth annual 'He Chandane Phulani' musical programme during Tripurari Pournima in Sawantwadi.
Sawantwadi News : ‘हे चांदणे फुलांनी’ संगीत मैफील उत्साहात
November 25, 2026
Goa Excise Department seizes illegal liquor worth ₹32.40 lakh and a truck at Patradevi checkpost.
Patradevi Illegal Liquor Seizure : पत्रादेवी तपासणी नाक्यावर ५७.४० लाखांच्या अवैध दारुसह ट्रक जप्त
November 25, 2026
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात नूतन शवपेटी
November 25, 2026
Fish transport vehicles causing slippery roads due to foul-smelling water discharge near Devgad Jetty.
Devgad News : व्यवसाय तुमचा, पण आमचा जीव धोक्यात का ?
November 25, 2026
संबंधित बातम्या

View all

Goa Excise Department seizes illegal liquor worth ₹32.40 lakh and a truck at Patradevi checkpost.
Patradevi Illegal Liquor Seizure : पत्रादेवी तपासणी नाक्यावर ५७.४० लाखांच्या अवैध दारुसह ट्रक जप्त
November 25, 2026
Container truck accident at Parshuram Ghat on the Mumbai-Goa Highway in Chiplun.
Parshuram Ghat Accident : परशुराम घाटात कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक
November 25, 2026
Police investigation following firing and machete attack outside Pune District Court in Shivajinagar.
Pune Court Firing Incident : पुणे जिल्हा न्यायालयाबाहेर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला; एक व्यक्ती गंभीर जखमी, दोन बंदुका जप्त
November 25, 2026
Forest Department seizes timber after illegal tree cutting at Talekhol Gadganjawadi in Dodamarg
Dodamarg Illegal Tree Cutting : तळेखोलमध्ये अवैध वृक्षतोडीवर वनविभागाची कारवाई
November 24, 2026