LIVE UPDATES

दारू कमी पिण्याचा सल्ला दिल्याने पत्नीला दांड्याने मारहाण

पतीविरोधात कणकवली पोलिसांत गुन्हा दाखल
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 02, 2026 20:14 PM
views 40  views

कणकवली : 'दारू कमी पी' असे सांगितल्‍याच्‍या रागाने पत्निला दांड्याने मारहाण केल्‍याबाबत पती स्‍वप्‍नील शशिकांत राणे (४० रा. लोरे नं. १) संशयिताविरोधात कणकवली पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी १२.३० वा. सुमारास राणे यांच्‍या राहत्‍या घरी घडल्‍याचे फिर्यादीत म्‍हटले आहे.

फिर्यादीनुसार, स्‍वप्‍नील याला दारू पिण्‍याचे व्‍यसन आहे. पत्निने चांगले वागायला सांगितले की स्‍वप्‍नील याला राग येतो. शुक्रवारी दुपारच्‍या सुमारास स्‍वप्‍नील याला मित्राचा फोन आला. त्‍यावर पत्निने, 'दारू लिमिटमध्‍ये राहूदे.', असे म्‍हटले. त्‍याचाच राग येऊन स्‍वप्‍नील याने बाजूलाच असलेल्‍या लाकडी आरामखुर्चीचा दांडा घेऊन पत्निच्‍या डोक्‍यावर, पायावर मारून दुखापत केली. याचवेळी स्‍वप्‍नील याने पत्निच्‍या पाठीवर लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. तसेच 'तुला काय करायचे ते कर. तुझी मी कशी वाट लावतो, ते बघ.', अशी धमकीही दिल्‍याचे फिर्यादीत म्‍हटले आहे.