LIVE UPDATES

Kankavli Fraud Case : वर्षभरापूर्वीच्‍या फसवणुकीतील आरोपी अटक

'एलसीबी'च्‍या पथकाची कारवाई
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 02, 2026 20:04 PM
views 36  views
Kankavli police arrest suspect in Rs 4.80 lakh vehicle fraud case

कणकवली : बँक अधिकारी असल्‍याचे भासवून जप्‍त केलेले वाहन कमी किंमतीत मिळवून देण्‍याचे आश्‍‍वासन देन रतनकुमार सावंत यांची ४ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करणारा संशयित आरोपी मंगेश राघोजी बागवे (वय ५२, रा. सुदामवाडी, अर्जुन डोंबिवली पूर्व, मूळ रा. मसुरे - देऊळवाडी, ता. मालवण) याला स्‍थानिक गुन्‍हा अन्‍वेषण शाखेच्‍या पथकाने डोंबिवली येथे सापळा रचून अटक केली. त्‍याला कणकवली पोलिसांच्‍या ताब्‍यात देण्‍यात आले आहे.

ही घटना जूलै २०२५ मध्‍ये घडली होती. याबाबत रतनकुमार यांच्‍या फिर्यादीवरून संशयित मंगेश याच्‍यावर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. मात्र, फिर्याद दाखल झाल्‍यापासून आरोपी पसार होता. मात्र, एलसीबीच्‍या टीमने गुप्त माहितीगारामार्फत माहिती मिळविली. यात संशयित आरोपी डोंबिवली येथे असल्‍याचे समजाल्‍यानंतर एलसीबीच्‍या टीमने तेथे जात त्‍याला गजाआड केले.

कारवाईत पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्‍पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, एलसीबी पोलीस निरीक्षक प्रविण कोल्‍हे यांच्‍या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे सहाय्‍यक पोलीस निरीक्षक सनील पाटील, सहाय्‍यक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर, हवालदार ज्ञानेश्‍‍वर तवटे, किरण देसाई, अविनाश ओटवणेकर आदी सहभागी झाले होते.