
कुडाळ : दिवाळीच्या तोंडावर नागरिकांची खरेदीची सोय व्हावी यासाठी 'महालसा ब्रँड' खास 'महाबचत महा सेल' घेऊन आला आहे. कुडाळमध्ये पहिल्यांदाच 'फॅक्टरी स्टॉक क्लिअरन्स सेल' आयोजित करण्यात आला असून, यामध्ये ग्राहकांना १ किलो कपडे फक्त ९९९ रुपयांत खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
वजनानुसार खरेदीची आगळीवेगळी संधी !
या सेलचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकांना कपड्यांची खरेदी वजनानुसार करता येणार आहे. ग्राहक १ किलो कपडे विकत घेऊ शकतात किंवा १०० ग्रॅम देखील खरेदी करू शकतात. जेवढे कपडे घेतले जातील, तेवढेच पैसे द्यावे लागणार आहेत.
सर्व प्रकारचे कपडे उपलब्ध :
या सेलमध्ये जीन्स, टी-शर्ट, शर्ट, टॉप, कुर्ती, नाईट पॅन्ट, बरमोडा, साडी, लेगीज, प्लाझो आणि लहान मुलांचे सर्व प्रकारचे कपडे सर्व साईजनुसार उपलब्ध आहेत. दिवाळीच्या खरेदीसाठी लागणारे कपड्यांचे संपूर्ण कलेक्शन एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
केवळ २५ तारखेपर्यंत सेल :
हा खास सेल फक्त २५ तारखेपर्यंतच उपलब्ध असणार आहे. खरेदीसाठी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंतची वेळ ठेवण्यात आली आहे.
ठिकाण आणि संपर्क :
नागरिकांनी या महाबचत सेलचा लाभ घेण्यासाठी चामुंडेश्वरी मंगल कार्यालय हॉल, सिंधुदुर्ग पॅलेस, पिंगळी, कुडाळ येथे भेट द्यावी. अधिक माहितीसाठी ९३८०७७६७६७ या क्रमांकावर संपर्क साधू शकता. कुडाळमधील नागरिकांनी या संधीचा फायदा घेऊन आपली दिवाळीची खरेदी भरघोस सवलतीत करावी, असे आवाहन 'महालसा ब्रँड'ने केले आहे.