
सावंतवाडी : मराठा करिअर अकॅडमी सावंतवाडीच्या चार विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे. पोलिस परेड मैदान येथे यानिमित्ताने मराठा करिअर अकॅडमीकडून गुलाल उधळत व पेढे वाटत मोठा जल्लोष करण्यात आला. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा हार व फेटे घालत सत्कार करण्यात आला.
भारतीय सैन्य दलात कारिवडे गावच्या मंथन एकनाथ जाधव, प्रणव उमेश भालेकर , इन्सुलीचा बाळा रामचंद्र सावंत तर केर गावच्या कौशल महादेव देसाई याची निवड झाली असून याबद्दल संचालक बापू रविंद्र परब यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं आहे. मराठा करिअर अकॅडमीत मिळालेल्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळालं असून या विद्यार्थ्यांच यश इतरांना प्रेरणादायी ठरेल असा विश्वास देवदास सावंत यांनी व्यक्त केला. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन भाऊ सावंत, राहुल परब, विशाल मोहिते यांच मार्गदर्शन लाभलं. यावेळी संचालक बापु सावंत, महेंद्र सावंत, देवदास सावंत यांच्यासह मराठा करिअर अकॅडमीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.














