
कणकवली : युथ गेम्स नॅशनल तायकोंडो चॅम्पियनशिपमध्ये ऋणमय राजेश शिरवलकरला सुवर्ण पदक प्राप्त झाले. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त कणकवली प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या हस्ते शिरवलकर याला पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे, नगराध्यक्ष संदेश पारकर, माजी आमदार राजन तेली, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, मुख्याधिकारी गौरी पाटील उपस्थित होते.














