वैश्यवाडा प्रीमियर लीगचे एन व्ही बॉईज संघ मानकरी

Edited by: विनायक गांवस
Published on: January 27, 2026 19:09 PM
views 14  views

सावंतवाडी : वैश्यवाडा प्रीमियर लीग 2026 च्या पहिल्या सत्राचे विजेतेपद धीरज सुकी व गजानन सुकी यांच्या एन व्ही बॉईज संघाने मिळवून कै. राकेश नेवगी स्मृती चषकाचे मानकरी ठरले. तर वैभव म्हापसेकर यांचा युनायटेड डेव्हिल संघ उपविजेता ठरला.                 


 कोलगाव निरुखे येथील तनुश स्पोर्ट क्लब च्या टर्फ विकेटवर वैश्यवाडा कला क्रीडा मंडळ व श्री हनुमान मंदिर उत्सव समितीच्यावतीने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सकाळी सौ. विद्या सुकी व नगरसेविका मोहिनी मडगावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व नगरसेवक आनंद नेवगी यांच्या हस्ते लोगोचे अनावरण करून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगरसेविका नीलम नाईक, माजी नगरसेवक ॲड. परिमल नाईक, उत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद कोदे, माजी अध्यक्ष प्रकाश सुकी, माजी अध्यक्ष दीपक म्हापसेकर, क्रिकेटपटू आनंद आळवे, महेश कोरगावकर, महेश म्हापसेकर, माजी उपनगराध्यक्ष महेश सुकी, आनंद म्हापसेकर, विजय टोपले, मंगेश परब व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय म्हापसेकर यांनी केले. या सामन्यामधे सहभागी वैभव म्हापसेकर यांचा युनायटेड डेव्हिल, दीपक म्हापसेकर व बंड्या सुकी यांचा बिडी वॉरियर्स, वैशाख मिशाळ यांचा गोल्डफिश इलेवन, धीरज व गजानन सुकी यांचा एन व्ही बॉईज, धीरेद्र म्हापसेकर यांचा श्रील वॉरियर्स, अंकिता व राहुल नेवगी यांचा फीयरलेस फायटर या सहाही संघांमध्ये अटीतटीच्या लढती झाल्या.  सर्व सामन्यामध्ये मिळून मालिकावीर किताब युनायटेड डेव्हिल च्या अनिकेत म्हापसेकरने मिळवला. त्याने सर्वच सामन्यात षटकारांची आतषबाजी केली. उत्कृष्ट गोलंदाज एन व्ही बॉईजचा अमन शेख, उत्कृष्ट फलंदाज फियरलेस फायटरचा राहुल नेवगी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गजानन सुकी यांनी बक्षिसे मिळवली. रात्री उशिरा नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेविका मोहिनी मडगावकर, नगरसेविका नीलम नाईक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी दया शिरसाट, सौ. अस्मिता नेवगी, सौ.अंकिता बांदेकर, सौ. अंकिता म्हापसेकर, श्रीकृष्ण पिळणकर, धोंडी दळवी, राजेश नार्वेकर, सचिन तेली, मनोज शिरोडकर, वैशाख मिशाळ, हनुमंत शिरोडकर, साईनाथ मिशाळ, श्रीरंग म्हापसेकर आपा कुडतरकर वगैरे उपस्थित होते. ही स्पर्धा पहाण्यासाठी शेकडो क्रीडा रसिक उपस्थित होते.  या स्पर्धेच्यl आयोजनासाठी गजा कोदे,  केतन कालेलकर, रुपेश कुडतरकर, संकेत शिरसाट, अक्षय म्हापसेकर, सोहम सुकी, विनू सुकी, प्रथमेश टोपले, यश जीवने, मृणाल चेंडके, नरेश जीवने, गजा सुकी, मिलिंद सुकी, रुतिक कोरगावकर  यांनी मेहनत घेतली, सामन्याचे पंच म्हणून यशवंत गाड, प्रतीक पाटील, गौरेश कुडाळकर यांनी तर गूण लेखक सुदेश राणे, धावते समालोचन रणजीत जाधव, संजय म्हापसेकर, यांनी केले.  तनुष स्पोर्टच्या विजय सावंत यांचे चांगले सहकार्य लाभले.