नेरूर इथं सर्वपक्षीयांकडून अजित पवारांना श्रद्धांजली

Edited by: kudal
Published on: January 28, 2026 14:48 PM
views 270  views

कुडाळ : आज झालेल्या भीषण विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यासह कुडाळ तालुक्यातही हळहळ व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कुडाळ तालुक्यातील नेरूर चव्हाटा येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालय येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना व अपघातातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

घडलेली विमान अपघाताची घटना ही अत्यंत दुःखद आणि मनाला चटका लावणारी आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नेरूर येथील कार्यकर्त्यांनी राजकारण बाजूला ठेवून एकत्र येत मृतांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना केली. यावेळी उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून आपल्या भावना व्यक्त केल्या.