
मुंबई : तळागाळातील कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने ताकद देणारे, त्यांना घडवणारे आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे नेतृत्व आज हरपले असल्याची भावना मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कार्यकर्त्यांना सक्षम कसे करायचे हे संपूर्ण महाराष्ट्राला शिकवले, असे त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळात एकत्र काम करताना अजितदादांची प्रशासनावरची मजबूत पकड, धाडसी निर्णयक्षमता आणि कामाची शिस्त जवळून पाहण्याची संधी मिळाल्याचे नितेश राणे म्हणाले. अजितदादांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाल्याचे सांगत त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.










