सिंधुदुर्ग हौशी ॲथलेटिक असोसिएशनच्या रनिंग स्पर्धेत झोया शेख प्रथम

Edited by: विनायक गांवस
Published on: January 21, 2026 19:02 PM
views 13  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलची इयत्ता दुसरीतील विद्यार्थिनी झोया शेख हिने सिंधुदुर्ग जिल्हा हौशी ॲथलेटिक असोसिएशनच्या वतीने आयोजित 50 मीटर व 100 मीटर रनिंग स्पर्धेत सब ज्युनिअर गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला तसेच इयत्ता सहावीतील विद्यार्थी झियाद शेख याने 60 मीटर रनिंग स्पर्धेत चतुर्थ क्रमांक पटकावला. 

या दोन्ही विद्यार्थ्यांची  कोपरगाव अहिल्यानगर जिल्हा येथे 7 व 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी  निवड झाली आहे. या  यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीमंत राजेसाहेब  खेमसावंत भोंसले ,चेअरमन श्रीमंत राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोंसले, कार्यकारी विश्वस्त श्रीमंत लखमराजे भोंसले , विश्वस्त युवराज्ञी श्रद्धाराजे  भोंसले व मंडळाचे संचालक श्री दिलीप देसाई, मंडळाचे सहाय्यक संचालक ॲड. शामराव सावंत, मंडळाचे सदस्य श्री जयप्रकाश सावंत, डॉ.सतीश सावंत, मुख्याध्यापिका अनुजा साळगावकर तसेच प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक शिक्षक संघ कार्यकारी समितीचे सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या.