LIVE UPDATES

तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत श्री जनता विद्यालयाचे घवघवीत यश

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 15, 2026 16:12 PM
views 33  views

सावंतवाडी : तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत श्री जनता विद्यालय तळवडेच्या खेळाडूंनी वेगवेगळ्या प्रकारात आपले कौशल्य पणाला लावून उल्लेखनीय यश संपादन केले. विद्यालयाचे एकूण  ४० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी २३ विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे. 

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे,  सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा कार्यालय व सावंतवाडी तालुका व्यवस्थापन समिती यांच्या वतीने तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धांचे आयोजन खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा च्या मैदानावर केले होते.  या स्पर्धेत १४ वर्षाखालील खेळाडूंनी ४×१०० मी. रिले मुली- प्रथम .या संघात कीर्ती पेडणेकर, हर्षा लोके, खुशी नाईक ,स्वरा सातार्डेकर, आराध्या नाईक या खेळाडूंचा सहभाग होता. वैयक्तिक मध्ये कुस्ती- योग सोनवणे- प्रथम, १०० मी. धावने- कीर्ती पेडणेकर- द्वितीय, हर्षा लोके -तृतीय,६०० मी. धावणे -निहार पेडणेकर- प्रथम, आराध्या नाईक- तृतीय, लांब उडी- कीर्ती पेडणेकर- तृतीय 

१७ वर्षाखालील वयोगटात रिले  ४x१०० मी . धावणे मुलगे - द्वितीय , या गटात आर्यन नागडे, सुरज गावडे, विघ्नेश शिरोडकर, अभीर पेडणेकर, निखिल सोनवणे या खेळाडूंचा सहभाग होता. वैयक्तिक मध्ये १०० मीटर धावणे- आर्यन नागडे- द्वितीय, ८०० मीटर धावणे- श्रावणी दळवी- द्वितीय ,सौम्या मिस्त्री- तृतीय, १५०० मीटर धावणे- गुरुनाथ मांजरेकर- द्वितीय ,आरुषी सावंत तृतीय, ३००० मीटर धावणे- कोमल नाईक- द्वितीय, लांब उडी- आर्या मांजरेकर- द्वितीय, गोळा फेक- आर्या  पावणोजी- तृतीय , उंच उडी- आर्या सावंत- प्रथम 

वरील प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची निवड सिंधुदुर्ग नगरी क्रीडा संकुल ओरस येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झालेली आहे. या खेळाडूंना विद्यालयाचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक दयानंद बांगर, विजय सोनवणे, शांताराम गवई यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रतापराव देसाई, सर्व संस्था पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.