तळवडे भाकरवाडी युवक क्लब क्रिकेट स्पर्धेत मनीष इलेव्हन संघ विजेता

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 29, 2026 14:47 PM
views 109  views

देवगड : देवगड तळवडे येथील भाकरवाडी युवक क्लब तळवडे आयोजित मर्यादित षटकांच्या भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये मनीष इलेव्हन संघ ठरला भाकरवाडी चॅम्पियन ट्रॉफी 2026 चा मानकरी. यावेळी सेमी फायनल मध्ये मनीष इलेव्हन संघाने रुईची फलटण कट्टा संघाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला तर सचिन कदम मित्र मंडळ गढीताम्हाने संघाने विल्सन वागदी संघाचा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान प्राप्त केले.

अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून मनीष इलेव्हन संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला तर प्रथम फलंदाजी करताना सचिन कदम मित्र मंडळ गढीताम्हाणे संघाच्या शुभम चिंदरकर यांच्या 30 धावांच्या जोरावर 6षटकांमध्ये 80 धावांचा डोंगर रचला. त्याला प्रत्युत्तर देताना मनीष इलेव्हन संघाच्या निलेश कदमच्या षटकारांच्या आतषबाजीने 46 धावा जमवताना आपल्या संघाला 5.3 षटकांमध्ये विजयश्री मिळवून दिला व भाकरवाडी चॅम्पियन ट्रॉफीवर आपले नाव कोरले. यावेळी मनीष इलेव्हन संघाने विजेतेपद तर सचिन कदम मित्र मंडळ गढीताम्हाणे संघाने उपविजेते पद पटकाविले. प्रथम 'विजेत्या संघाला २५ हजार रुपये व कायम चषक तर उपविजेत्या संघाला १५ हजार रुपये व कायम चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कणकवली संघाला पाच हजार व चषक तर चतुर्थ क्रमांक रूहीची फलटण संघाला तीन हजार रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. भाकरवाडी युवक क्लब तळवडे पुरस्कृत या मर्यादीतषटकांच्या भव्य खुल्या ओव्हरआर्म टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा कै.मंगेश अनभवणे स्टेडियम येथे घेण्यात आल्या होत्या.या स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक तथाप्रसिद्ध आंबा बागायतदार मंगेश धुरी यांच्या यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गुणाजी कोयंडे सरसरपंच गोपाळ रुमडे बीवायसीसीचे अध्यक्ष प्रसाद दुखंडे, दयानंद मोंडकर, श्वेता शिवलकर, हेमंत कुलकर्णी, अवधूत मोंडकर, दिलीप दुखंडे, सुवर्णा दिलीप दुखंडे, अमित कदम, श्वेता शिवालकर - माजी सरपंच, शितल गुरव आधुनिक सावित्री पुरस्कार प्राप्त अक्षता मोंडकर, हरिश्चंद्र मोंडकर, राजेश साटम पोलिस पाटील पाटील, शौकत शेख, एकनाथ घाडी, दिनकर घाडी भाग्यश्री धुरी, प्रमोद लब्दी भाग्यश्री धुरी आदी उपस्थित होत.

या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाज- वैभव थोटम, तर उत्कृष्ट फलंदाज अक्षय कदम, मालिकावीर शुभम चिंदरकर यांना सन्मानित करण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभाला गुणाजी कोयंडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाकरवाडी युवक क्रिकेट क्लबचे अध्यक्ष प्रसाद दुखंडे यांनी केले.