सुखसमृद्धीचा वर्षाव...श्री गणरायाचा खरा भक्तिभाव..ओट्रा प्रेस्टीज | स्पोर्ट सिटी

मुंबई-गोवा महामार्गावर ओरोस इथला अत्यंत देखणा प्रकल्प
Edited by: गुरुप्रसाद दळवी
Published on: September 02, 2022 11:46 AM
views 363  views
हायलाइट
स्विमिंग पूल, क्लब हाऊस, इनडोअर गेम्स
सहा बिल्डिंग, 218 फ्लॅट्स, वन आरके, वन बीएचके, टू बीएचके, एक बंगलो
सुसज्ज जीम, याच बरोबर प्रशस्त पार्किंग आणि भव्य गार्डन

सततची धावपळ आणि कामाच्या टेन्शनमुळे अनेकांची लाईफस्टाईल अत्यंत गुंतागुंतीची बनते. अशावेळी आपल्या आवडत्या छंदांसाठी वेळ काढणं, निरोगी हेल्थसाठी व्यायाम करणं असे काही पर्याय समोर असतात, परंतु त्यासाठी लागणारी साधने आपल्या आजूबाजूला नसतात. असे अनेकदा होते आणि या आपल्या जीवनातील सुखद क्षणांना आपण मुकतो. हल्लीच्या आधुनिक जीवनशैलीत निर्माण झालेली ही गुंतागुंत वाटते तितकी साधी सोपी नसते. आरोग्यावर याचे नंतर गंभीर परिणाम होतात. यावर वेळीच पर्याय शोधण्याची गरज असते. लोकांच्या जीवनशैलीत अतिशय सकारात्मक आणि सुखद असा बदल करण्यासाठी ओळखले जाणारे एक नाव म्हणजे 'ओट्रा इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रा. लि.'.

'ओट्रा'ने जीवनातील या सर्व गुंतागुंतीचा अतिशय बारकाईने विचार करून एक अतिशय अभ्यासपूर्वक प्रकल्प उभारला तो म्हणजे ओट्रा प्रेस्टिज. खरं तर बांधकाम क्षेत्रातला पहिला आणि क्रांतिकारक असा हा प्रकल्प आहे. यामध्ये केवळ सुखसोयी नव्हे तर आपल्या व्यवसायाच्या, उद्योगाच्या समृद्धीचाही अतिशय बारकाईने विचार केला आहे. म्हणजे या प्रकल्पात आपण सहभागी होण्यामुळेच आपल्या जीवनात आपण चार पावले पुढे जाऊ शकतो.

गणेश चतुर्थी म्हणजे कोकणचा लोकोत्सव. या मंगल उत्सवात अनेक शुभकार्यांना प्रारंभ केला जातो. ओट्रा प्रेस्टीज हा प्रकल्प या मंगल उत्सवात श्री गणरायाने आपल्याला दिलेला जणू प्रसादच आहे. या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा प्रकल्प आता ओट्रा प्रेस्टीज स्पोर्ट सिटी म्हणून ओळखला जातोय. अत्यंत सुबक, देखणा, मजबूत, दर्जेदार आणि प्रत्येकाच्या मनात भरावा असा हा शानदार प्रकल्प आहे. यामध्ये सहा बिल्डिंग, 218 फ्लॅट्स, वन आरके, वन बीएचके, टू बीएचके, एक बंगलो अशी याची रचना आहे. अन्य कोणत्याही प्रकल्पात आपल्याला पाहायला मिळणार नाही अशी स्पोर्ट्स सिटी इथे आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस, इनडोअर गेम्स, टेबल टेनिस, चेस, कॅरम, सुसज्ज जीम, याच बरोबर प्रशस्त पार्किंग आणि भव्य गार्डनचाही समावेश आहे. अत्यंत कल्पकतेने आणि प्रत्येकाच्या सुखी, समृद्ध जीवनाचा विचार करून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

चतुर्थीत एका समृद्ध जीवनाची सुरुवात करण्यासाठी ओट्रा प्रेस्टिज हा अत्यंत फायदेशीर असा पर्याय आहे. या प्रकल्पाचे आणखी एक सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचं लोकेशन मुंबई-गोवा महामार्गावर खरयेवाडी इथं हॉटेल गंगाईच्या समोरच हा प्रकल्प साकारतोय. दळणवळणासाठी अत्यंत सोयीचा आणि सुलभ असा हा प्रकल्प आहे. त्यामुळे या ओट्रा प्रेस्टिज स्पोर्ट सिटी मध्ये आजच बुकिंग करा.

  • अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क
    8530043411
    8530203411
    8530333411
  • www.otrainfra.com