
सिंधुदुर्ग : अनुभव शिक्षा केंद्र मार्फत दि 17 मे ते 26 मे 2025 असा दहा दिवसांचा युथ लीडरशिप बिल्डिंग कोर्स बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण येथे संपन्न झाला. या कोर्सच्या प्रमाणपत्र वितरणवेळी सेवांगणचे सेक्रेटरी लक्ष्मीकांत खोबरेकर, अनुभवचे राज्य समन्वयक सचिन नाचणेकर, व्यवस्थापक संजय आचरेकर, जिल्हा प्रशिक्षक सहदेव पाटकर, विशाल गुरव, दरक्षा शेख उपस्थित होत्या.
यावेळी अनुभव शिक्षा केंद्रचे कौतुक करताना खोबरेकर म्हणाले कि असे स्तुप्त उपक्रम तरुणांच्या चडणघडणीसाठी महत्वाच्या ठरतात. विचारांमध्ये वृद्धी होते. सोबतच सेवांगणचे उपक्रमांची माहिती दिली. मा सचिन नाचणेकर यांनी शिबिरातील गोष्टी आचरणात आणून ते विचार आत्मसात करा असे सांगितले.
या कोर्समध्ये मी आणि माझा समाज या विषयावर सचिन नाचणेकर यांनी मार्गदर्शन केले. सोबतच संविधान साथी कृतार्थ, लिंग समानता साथी आरती आणि महेंद्र, क्रिटिकल थिंकिंग साथी आसमा, जात, धर्म आणि वर्ग याकडे युवकांचा पाहण्याचा दृष्टिकोन या विषयावर साथी संजय मंगला गोपाळ, धोरण, नियोजन आणि बजेट या विषयावर साथी रुपेश कीर, ७३/७४ घटना दुरुस्ती साथी ऋषिकेश पाटील, माहितीचा अधिकार साथी प्रकाश बावरे, सोशल मीडिया आणि नेरेटिव बिल्डिंग साथी डोएल आणि विशाल गुरव, संघटन बांधणी, निर्णय प्रक्रिया आणि संसाधनांचा वापर हे साथी राजेश जाधव यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे आभार सहदेव पाटकर यांनी मांडले. यावेळी उपस्थित मान्यवर यांच्या समवेत ज्यांनी अप्रत्यक्ष पणे सहकार्य केले त्या सर्वांप्रती ऋण व्यक्त करण्यात आले. शिबिरातील सहभागी प्रशिक्षणार्थी एक वर्षाचा कार्यक्रम आराखडा तयार करून आपल्या कॉलेज, गाव या वस्तीमध्ये उपक्रम राबवतील.