राजन तेलींच्या संपर्क कार्यालयात ठाकरे शिवसेनेची बैठक

सक्षम विरोधी पक्ष म्हणून करणार काम
Edited by: विनायक गांवस
Published on: January 02, 2025 16:56 PM
views 295  views

सावंतवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना येणाऱ्या काळात पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी काम करणार आहे. जनतेचे प्रश्न तळागाळात जाऊन सोडवण्यावर पक्षाचा भर राहणार आहे. यासाठी शिवसेनेचे जिल्ह्यातील सर्व नेते एकत्ररित्या नेतृत्व करून काम पाहणार आहेत असे उबाठा शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांनी स्पष्ट केले. तर सत्ताधारी पुढील सहा महिन्यात काय काम करतात हे पाहून वेळ पडल्यास जनतेच्या प्रश्नांसाठी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भव्य मोर्चा तसेच आंदोलने ही हातात घेऊन विरोधीपक्ष ही नगण्य नाही हे दाखवून देणार असेही यावेळी सांगितले.


येथील राजन तेली यांच्या संपर्क कार्यालयात सावंतवाडी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्ह्यातील नेतेमंडळींच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर, माजी आमदार राजन तेली, माजी आमदार वैभव नाईक, सतीश सावंत, संदेश पारकर, मंदार शिरसाठ, श्रेया परब, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, सावंतवाडी तालुकाप्रमुख मायकल डिसोजा, शब्बीर मणियार बाळू माळकर आधी उपस्थित होते. यावेळी उपरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना बळ देण्यासाठी व त्यांच्या मते उत्साह वाढवण्यासाठी येणाऱ्या काळात ठाकरे शिवसेनेचे जिल्ह्यातील नेते काम करण्यात आहे प्रत्येक तालुक्यात वेळ पडल्यास विभाग स्तरावर बैठक घेऊन तेथील जनतेचे प्रश्न सोडविले जाणार आहेत यापुढे जनतेसोबत राहण्याचा ठाकरे शिवसेनेने निर्णय घेतला असून राज्यातल्या घटनेचा पडसाद तात्काळ जिल्ह्यात उमटण्याच्या दृष्टीनेही आम्ही काम करणार आहोत सत्ताधाऱ्यांकडून चांगल्या कामाची अपेक्षा आहे परंतु येत्या सहा महिन्यात ही अपेक्षा पूर्ण न झाल्यास सत्ताधाऱ्यांच्या विरोधातही मोर्चा काढण्यात येईल. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनतेवर अन्याय होत आहेत त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यकर्ते अधिकाऱ्यांकडे केल्यास कार्यकर्त्यांना अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांप्रमाणेच मानसन्मान देणे गरजेचे आहेत विरोधी पक्ष म्हणजे नगरने नाही हे सुद्धा आम्ही येणाऱ्या काळात अधिकाऱ्यांना दाखवून देऊ सर्व पदाधिकाऱ्यांना मानसन्मान मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.

वैभव नाईक म्हणाले लोकांना विरोधी पक्ष म्हणून सक्षम पर्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे या ठिकाणी काम करत असताना कोणी एक जण नेतृत्व करणार नाही तर सर्व एकत्र मिळून नेतृत्व करून जनतेचे प्रश्न सोडवणार आहे सासोलीतील जमिनीचा प्रश्न म्हणा किंवा अन्य गोष्टीतून जनतेला होणारा त्रास पाहता आम्ही त्या दृष्टीने जनतेमध्ये जाऊन काम करणार आहोत. तर सत्ताधाऱ्यावर अंकुश ठेवण्याचे काम विरोधी पक्ष म्हणून आम्ही करणार असल्याचे राजन तेली यांनी सांगितले येणाऱ्या काळात शिवसेनेला या ठिकाणी पुन्हा उभारी देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून स्थानिकांशी बोलून त्यांचे प्रश्न समजून घेऊन जनतेसाठी आम्ही कार्यरत राहणार आहोत.