सावंतवाडीत मोफत रुग्ण तपासणी, ब्लड शुगर तपासणी शिबिर

श्री स्वामी समर्थ पॉलिक्लिनीकच आयोजन
Edited by:
Published on: June 03, 2025 17:36 PM
views 181  views

सावंतवाडी : भारतामध्ये मधुमेहाचे वाढते प्रमाण ही एक गंभीर समस्या आहे. २००० मध्ये ३२ दशलक्ष असलेली रुग्णांची संख्या २०२४ मध्ये ९३ दशलक्ष इतकी झालेली आहे. मधुमेहाचे प्रमाण वाढण्यामागे वेगाने होणारे शहरीकरण, बदलती जीवनशैली आणि आहारातील बदल ही प्रमुख कारणे आहेत. यासाठी प्रत्येक रुग्णाला तज्ञांकडून योग्य सल्ला घेणे हे अत्यंत आवश्यक झालेले आहे. यासाठी मोफत उपचार आणि सल्ला देण्यासाठी तज्ञ डॉक्टर सावंतवाडीतील श्री स्वामी समर्थ पॉलिक्लिनीक येथे उपलब्ध झाले असून मोफत रुग्ण तपासणी, ब्लड शुगर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आल आहे.

डॉ. आदिल अहमद (मधुमेहतज्ञ,  MBBS Latur, Fellowship in Diabetes mellitus and Clinical Nutrition) हे अपोलो हॉस्पिटल दिल्ली येथे कामाचा अनुभव असलेले सुप्रसिद्ध मधुमेह तज्ञ असून शिबिरात रूग्णांची तपासणी करणार आहेत. डायबेटिसमुळे होणाऱ्या त्रासांवर जसे हातापायांना मुंग्या येणे, हात पाय बधीर होणे, तळपायांची आग होणे, अशक्तपणा वाटणे, चक्कर येणे, वजन प्रमाणापेक्षा कमी किंवा जास्त होणे, इन्सुलिन घेऊ नही शुगर नियंत्रणात न येणे, तसेच डायबेटिसमुळे होणाऱ्या इतर सर्व त्रासांवर शास्त्रोक्त उपचार व मार्गदर्शन तसेच आहाराविषयी विशेष मार्गदर्शन तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येणार आहे. तसेच शिबिरामध्ये नोंद करणाऱ्या पहिल्या पन्नास पेशंट करिता HbA1 C ब्लड शुगर टेस्ट, तसेच रँडम ब्लड शुगर टेस्ट पूर्णपणे मोफत केली जाईल. बुधवार दि. ११ जून २०२५ रोजी सकाळी १० ते दु. ३.०० वा. पर्यंत श्री स्वामी समर्थ पॉलिक्लिनिक, हॉटेल वैष्णव शेजारी, वैश्य भवन बिल्डिंग, गवळी नाका, सावंतवाडी येथे हे शिबीर होणार आहे. नाव नोंदणीसाठी अहिल्या मेडिकल स्टोअर्स, गवळी तिठा, सावंतवाडी 9403035094, 9422434965 येथे संपर्क साधावा असे आवाहन श्री.आनंद रासम यांनी केले आहे.