
देवगड : देवगड येथील ऍड. शामसुंदर जोशी यांची नोटरी पदी नियुक्ती झाली आहे. जोशी यांची भारत सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाने नोटरी पदी नियुक्ती केली आहे. ऍड.जोशी हे देवगड येथील प्रसिद्ध दिवाणी व फौजदारी विधीज्ञ असून ते आता केंद्र सरकारद्वारा संपूर्ण देवगड विभागासाठी नोटरी म्हणून नियुक्त झाले आहेत.
देवगड तालुक्यातील नामांकित वकील शामसुंदर विठ्ठल जोशी हे गेली सुमारे 27 वर्षे वकील व्यवसायात कार्यरत आहेत. देवगड येथे दिवाणी न्यायालय तसेच जिल्हा न्यायालय येथे बरीच वर्षे कार्यरत असताना त्यांनी अनेक महत्वाचे खटले लढून जिंकलेले देखील आहेत. बऱ्याच अंशी त्यांनी विविध स्तरातील लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे.
वकील शामसुंदर जोशी यांची भारत सरकार नवी दिल्ली यांचेकडून नोटरी पब्लिक या महत्त्वाच्या पदावर (रजिस्टर नंबर 50120) दिनांक 01 एप्रिल 2025 रोजी नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यामुळे वकील शामसुंदर जोशी यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. देवगड तालुक्यामध्ये नोटरींची एकूण संख्या आता 9 झालेली आहे.मागील काही वर्षात त्यांनी अनेक क्लिष्ट दिवाणी व फौजदारी खटले यशस्वीरित्या हाताळले आहेत.
यांचे घराणे वकिली व्यवसायाशी संबंधित असून जोशी यांना पाच वर्षांच्या अवधीसाठी नोटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा न्यायालय देवगड येथील न्यायालयांमध्ये ऍड जोशी यांनी अनेक खटले चालवले आहेत.ऍड. जोशी यांची नोटरी पदावर नियुक्ती झाल्याने आता करार शपथपत्रे कुलमुखत्यारपत्र इत्यादी दस्त साक्षांकित करण्यासाठी देवगड मधील जनतेला सुविधा उपलब्ध झाली आहे.