मोपाच्या पहिल्या उड्डाणाचे साक्षीदार ठरले युवा नेते विशाल परब !

विमानतळ उभारणीतही विशाल परब यांचा वाटा !
Edited by: भरत केसरकर
Published on: January 05, 2023 15:16 PM
views 736  views

पणजी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नजीक असलेल्या गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अधिकृत उड्डाण  आजपासूप सुरू झाले. या पहिल्या गोवा ते मुंबई विमानात भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी हवाई प्रवास केला. भाजपचे गोव्याचे राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर यांच्यासोबत विशाल परब यांनी हा प्रवास केला.


पहिल्या प्रवासाने आपल्याला अतिशय आनंद झाला असून सिंधुदुर्गवासियांना हे विमानतळ म्हणजे एक पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे यांना धन्यवाद देत असल्याची प्रतिक्रिया या विमानातून प्रवास केल्यानंतर भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी कोकणसाद  लाईव्हला दिली.


सावंतवाडी इथून गोव्याला जाण्यासाठी दोन अडीच तास लागत होते. आता सावंतवाडीवरून अवघ्या पंधरा-वीस किलोमीटर अंतरावर असलेले मोपा अंतर गाठण्यासाठी अवघे पंधरा-वीस मिनिटे लागतात. आणि वेळेची बचतही होत असल्याची प्रतिक्रिया विशाल परब दिली आहे.


देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीतरी करून दाखवले असल्याची प्रतिक्रिया देत त्यांना धन्यवाद दिले आहेत. हा प्रवास सुखकर असल्याचे सांगत आता मोपा विमानतळ सुरू झाल्यानंतर आजपासून सुरू झालेल्या उड्डाणसेवेत विमानात पहिला प्रवासी म्हणून बसत असल्याचा आनंद होत असल्याची प्रतिक्रिया विशाल परब यांनी दिली आहे.


या मोपा विमानतळाच्या कामात विशाल परब यांचा मोलाचा मोठा वाटा आहे. या विमानतळासाठी लागणारी खडी  उद्योजक विशाल परब यांच्या कंपनीने पुरवली आहे. या विमानाला गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी हिरवा कंदील दाखवून उड्डाणाचा शुभारंभ केला.