दोडामार्ग शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीपकुमार राणे यांचं निधन

Edited by:
Published on: February 12, 2026 11:00 AM
views 14  views

दोडामार्ग : दोडामार्ग शहर बाजारपेठेतील प्रतिष्ठित नागरिक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिलीपकुमार धोंडू राणे (वय ७२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही काळापासून ते प्रकृती स्वास्थ्याने त्रस्त होते. राणे हे वीज वितरण कंपनी (महावितरण) येथे अप्पर डिव्हिजन क्लार्क पदावर कार्यरत होते. सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. सेवा निवृत्त महावितरण मंडळात त्यांनी काम केले होते. तसेच येथील हनुमान मंदिर देवस्थान व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

दोडामार्ग येथे पहिले वधू-वर सूचक मंडळ सुरू करण्याचे श्रेयही त्यांनाच जाते. त्यांच्या सामाजिक, धार्मिक व संघटनात्मक कार्यामुळे परिसरात त्यांना मानाचे स्थान होते. त्यांच्या पश्चात पत्नी ज्योती, मुलगे रजत व गौरीश यांसह सुना, नातवंडे, पुतणे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने दोडामार्ग शहर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.