कुडाळ मान्सून रनच्या लिंकचं प्रमोद भोगटेंच्या हस्ते अनावरण

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: February 12, 2026 11:15 AM
views 33  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य सेवेत असलेल्या राणे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर आणि टीम कुडाळ मान्सून रन तर्फे आयोजित 'कुडाळ मान्सून रन'च्या तिसऱ्या वर्षाचे बिगुल वाजले आहे. या भव्य हाफ मॅरेथॉनच्या रजिस्ट्रेशन लिंकचे अनावरण प्रमोद भोगटे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

'सुदृढ आरोग्य हाच सशक्त राष्ट्राचा पाया' ही संकल्पना घेऊन सलग तिसऱ्या वर्षी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी ५, १०, १६ आणि २१ किलोमीटर अशा चार गटांमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. विशेष म्हणजे, या मॅरेथॉनमध्ये सिंधुदुर्गासह मुंबई, गोवा, कोल्हापूर, बेळगाव, पुणे आणि रत्नागिरी येथील धावपटू मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. जी. टी. राणे, अजित राणे, गजानन कांदळगावकर, डॉ. प्रशांत सामंत, डॉ. प्रशांत मडव, डॉ. जयसिंग रावराणे, रुपेश तेली, शिवप्रसाद राणे, अमित तेंडोलकर, डॉ. सई राणे, सुजाता रासकर, डॉ. अंजना काजरेकर, डॉ. सुप्रिया मडव, डॉ. रोहन कोरगावकर, ॲड. सोनल पालव, डॉ. मिलिंद व गिरीश बॉर्डवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.