
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहेत. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांच्या प्रकृतीबद्दल देओल परिवाराने महत्त्वाची अपडेट दिलीय.
काही दिवसांपासून ते अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली होती आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्यामुळे त्यांच्या लाखो चाहत्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. लेटेस्ट अपडेटनुसार, धर्मेंद्र यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.














