जिल्हास्तरीय पहिलीच महाविद्यालयीन युवती क्रिकेट स्पर्धा

Edited by: निलेश ओरोसकर
Published on: February 12, 2026 12:09 PM
views 17  views

कुडाळ : अनुभव शिक्षा केंद्र व राऊळ महाराज महाविद्यालय, साळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय महाविद्यालयीन युवती क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडली. ही स्पर्धा जिल्हास्तरावर पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली होती, हे या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले. स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळ, झराप पंचक्रोशी मंडळाचे अध्यक्ष मुकुंद धुरी यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सचिन पाटकर, अनुभव शिक्षा केंद्राचे जिल्हा प्रशिक्षक  सहदेव पाटकर, निरवडे ग्रामपंचायत सदस्य  जयराम जाधव, कुमारी फिजा मकानदार, नासिर मकानदार आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक: रोख ₹२०२६/- व आकर्षक चषक (पुरस्कर्ते: फीज्जा मकानदार, सावंतवाडी) द्वितीय पारितोषिक: रोख ₹१०२६/- व आकर्षक चषक (पुरस्कर्ते: भूषण गावडे, नेरूर-कुडाळ)

तसेच वैयक्तिक बक्षिसांसाठी मैत्री ग्रुप केळुस, दर्शना पाताडे (खारेपाटण), साई ठाकूर (कणकवली) यांनी प्रत्येकी ₹५००/- चे योगदान दिले, तर संदीप चेंदवणकर यांनी स्पर्धेसाठी लागणारे चेंडू उपलब्ध करून दिले. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांच्या युवती संघांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ , भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी, एस.एस.पी.एम कॉलेज, कणकवली,  एम.एस.डब्ल्यू. कॉलेज, सावंतवाडी, नीलम पंत वालावलकर कॉलेज, देवगड, साळगाव महाविद्यालय, साळगाव हे महाविद्यालय सहभागी होते. स्पर्धेचे पंच म्हणून निखिल मालवणकर, प्रेम जाधव, मकरंद परुळेकर, शुभम नेरुरकर यांनी काम पाहिले. समालोचनाची जबाबदारी सिद्धेश म्हापनकर, सुदीप डिगवळेकर, उदय कदम, तर मालवणी समालोचक म्हणून राकेश शिंदे यांनी पार पाडली.

विजेता संघ : भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी, उपविजेता संघ: एस.एस.पी.एम कॉलेज, कणकवली, बक्षीस वितरण सोहळ्यास मा. मुकुंद धुरी,  सतीश साळगावकर, प्रा. सचिन पाटकर,  सहदेव पाटकर,  जयराम जाधव, संदीप चेंदवणकर, तुषार जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व सहभागी संघ व खेळाडूंना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचा क्रीडा विभाग प्रमुख तृप्ती नाईन, प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. जिल्ह्यातील युवती खेळाडूंना व्यासपीठ देणारी ही स्पर्धा सर्वार्थाने प्रेरणादायी ठरली.