आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा धक्कातंत्राचा अवलंब केला असून अशोक चव्हाण यांना वेलकम गिफ्ट भाजपने दिलंय. राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि अजित गोपछडे यांना यांना उमेदवारी दिली आहे. तर शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
काँग्रेसकडून देखील राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलंय.