गुजराथ विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची सुरवात

पंतप्रधान मोदी यांनी गांधीनगर राजभवन येथून निशान पब्लिक स्कूल राणीप येथे जाऊन आपला मताधिकार बजावला
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 05, 2022 14:26 PM
views 267  views

गांधीनगर : गुजराथ विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची सुरवात झाली असून ९३ जागांसाठी आज मतदान होत आहे. यात ८३३ उमेदवार रिंगणात आहेत आणि त्यात अपक्षांची संख्या २८५ आहे. पंतप्रधान मोदी यांनी सकाळी ९ च्या सुमारास गांधीनगर राजभवन येथून निशान पब्लिक स्कूल राणीप येथे जाऊन आपला मताधिकार बजावला आणि नागरिकांनी मतदान करावे असे आवाहन केले. गुजराथ मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल मतदान केंद्र ९५ , शिलाज अनुपम शाळेत मतदान करणार आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल मतदानासाठी गुजराथ मध्ये दाखल झाले असून आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार इसुदन गाढवी, गुजराथ कॉंग्रेसचे अध्यक्ष जगदीश ठाकूर, क्रिकेटपटू इरफान पठाण, हार्दिक आणि कुणाल पंड्या हे हाय प्रोफाईल मतदार आहेत. या टप्प्यात २.५ कोटी मतदार असून १४ जिल्ह्यातील १४९७५ मतदान केंद्रावर मतदान सुरु आहे. यासाठी १.१३ लाख निवडणूक कर्मचारी नेमले गेले आहेत. गुजराथ विधानसभा मतदानाचा पहिला टप्पा १ डिसेंबर रोजी पार पडला असून त्यात ६३.३१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील या मतदानासाठी गोवा पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.