जबरदस्त GOOD NEWS..! आता इंटरनेटशिवाय व्हॉट्सअॅपवर चॅटिंग!

व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांसाठी खुशखबर..!
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: January 07, 2023 16:14 PM
views 493  views

नवी दिल्ली : जगभर लोकप्रिय ठरलेल्या व्हॉट्सअॅप च्या व्यवस्थापनाने अब्जावधी यूजर्सना नवीन अनुभव देण्यासाठी आपल्या फिचर्समध्ये महत्वपूर्ण बदल करण्याचे ठरवले आहे. सातत्याने बदल करणा-या व्हॉट्सअ‍ॅपने आता काही भन्नाट अपडेट देण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअ‍ॅप यूजर्ससाठी हटके फीचर्स आणणार असून यात वापरकर्त्याला आता इंटरनेटशिवाय या प्लॅटफॉर्मचा वापर करून चॅटिंग करता येणार आहे. प्रॉक्सी सपोर्टच्या मदतीने व्हॉट्सऍप युजर्स इंटरनेटशिवायही कनेक्टेड राहू शकणार आहेत.

प्रॉक्सी नेटवर्कशी कनेक्ट राहण्यासाठी, तुम्हाला व्हॉट्सअॅप सेंिटग्जमध्ये जावे लागेल. येथे तुम्हाला स्टोरेज आणि डेटाचा पर्याय मिळेल. तुम्हाला प्रॉक्सी या पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि प्रॉक्सी अ‍ॅड्रेस टाकून सेव्ह करावे लागेल. काही कारणास्तव प्रॉक्सी कनेक्शन जोडल्यानंतरही तुम्ही मेसेज पाठवू शकत नसाल, तर ते ब्लॉक केले जाण्याची शक्यता आहे. अशात, तुम्हाला दुसरे प्रॉक्सी नेटवर्क वापरावे लागेल. युज प्रॉक्सीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रॉक्सी नेटवर्कचा अड्रेस तिथे टाकावा लागेल. जर कनेक्शन फेल झाले तर तुम्हाला चेकमार्क दिसेल. जर तुम्ही प्रॉक्सी कनेक्ट केल्यानंतरही तुम्ही मेसेज पाठवू शकला नाहीत, अथवा ते मिळत नसेल तर प्रॉक्सी ब्लॉक केलेले असू शकते. अशा परिस्थितीत तुम्हाला नवीन प्रॉक्सी नेटवर्क वापरावे लागेल.

गेल्या काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअॅपने नवीन फीचर आणले होते. त्यामध्ये चुकून डिलीट केलेले मेसेज अन डू ने परत आणले जाऊ शकतात. व्हॉट्सअ‍ॅपने अ‍ॅक्सिडेंटल डिलीट नावाने हे फीचर आणले होते. गेल्या महिन्यात व्हॉट्सऍपने भारतात मेसेज युवरसेल्फ फीचर लॉन्च करण्याची घोषणा केली. या फीचरमध्ये नोट्स, रिमांइडर आणि अपडेट पाठवण्यासाठी तुमचा स्वत:चा नंबर मेसेज करण्याची सुविधा आहे. या फीचर्समुळे युजर्स व्हॉट्सअ‍ॅपवर त्यांची टू-डू लिस्ट मॅनेज करण्यासाठी नोट्स, रिमाइंडर्स, शॉपिंग लिस्टसारखे मेसेज देखील पाठवू शकतात.