UPSC : नांदोसच्या तुषार पवारची बाजी ; देशात 861 वी रँक

Edited by: देवयानी वरसकर
Published on: May 23, 2023 20:21 PM
views 295  views

मालवण : नांदोस चव्हाणवाडी येथील सुपुत्र तुषार दीपक पवार (वय २४) यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी परीक्षेत यश संपादन केले असून संपूर्ण भारतातून ८६१ वी रँक प्राप्त केली आहे. तुषार हा सामान्य कुटुंबातून शिक्षण घेत या यशापर्यंत पोचला आहे. त्याचे वडील दीपक पवार हे कणकवली येथील खरेदी विक्री संघात काम करतात तर आई घरी शिवणकाम करते. त्यामुळे तुषार यांचे १२ पर्यत शिक्षण कणकवली येथे झाले. त्यानंतर पुणे येथे पुढील शिक्षण पूर्ण करत तुषार हे यूपीएससी अभ्यास करत होते. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत त्यानी यशाला गवसणी घातली. त्यांच्या या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.