
रिवण येथील दोन भाऊ, राजेंद्र गावकर (४६) आणि मोहनदास गावकर (४०) यांचा बुधवारी रात्री विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. आपल्या गुरांसाठी गवत कापण्यासाठी ते जंगलात गेले असता ही घटना घडली.
मिळालेल्या आलेल्या माहितीनुसार गुरुवारी (दि.२८) मध्यरात्री १२.४५ वाजता रिवोणा येथील पांडवसदा येथे दोन भावांचा विजेच्या तारेच्या संपर्कात आल्यामुळे मृत्यू झाला. केपे पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मृतांची नावे राजेंद्र काशिनाथ गावकर (वय ४६) आणि मोहनदास काशिनाथ गावकर (वय ४०) अशी असून, दोघेही पांडवसदा, रिवोणा येथील रहिवासी होते