LIVE UPDATES

Sindhudurg News : ओरोसच्या मुख्य रस्त्यांच्या कामाला अखेर सुरुवात

कोकणसाद LIVE’च्या वृत्तानंतर जाग ; खड्डे बुजवून रस्ता होणार गुळगुळीत
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: November 13, 2026 02:53 PM
views 7  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आणि प्रशासकीय केंद्र असलेल्या ओरोस येथील महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत ‘कोकणसाद LIVE’ ने वृत्त प्रसारित केले होते. या वृत्ताची गंभीर दखल घेत अवघ्या काही तासांतच ओरोस येथील मुख्य रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे साहाय्यक अभियंता अनिकेत गवस यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओरोस ग्रामीण मार्ग क्र. १२३ व ५३२ चे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्यात तात्पुरत्या स्वरूपात हे खड्डे सिमेंट-काँक्रिटने भरण्यात आले होते. आता हे खड्डे योग्य पद्धतीने बुजवून रस्त्याचे नूतनीकरण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रथम रस्त्यावरील सर्व खड्डे व्यवस्थित बुजवून रस्ता समतल (लेव्हल) केला जात आहे. त्यानंतर या संपूर्ण रस्त्यावर ‘कार्पेटिंग’ (डांबरीकरण) करून रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी सुरक्षित केला जाणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जिजामाता चौक ते डॉन बॉस्को सर्कल आणि डॉन बॉस्को सर्कल ते परी हॉटेल या प्रमुख टप्प्यांवर हे रस्ते दुरुस्तीचे काम केले जात आहे. आवश्यकतेनुसार कार्पेटिंगचे स्वरूप ठरवून रस्त्यांची झालेली दुरवस्था तातडीने दूर केली जात आहे.

जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय (कलेक्टर ऑफिस), पोलीस अधीक्षक कार्यालय (एसपी ऑफिस) आणि जिल्हा रुग्णालय या अतिमहत्त्वाच्या कार्यालयांकडे जाणाऱ्या या मार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले होते. ‘कोकणसाद LIVE’ चॅनलवर वृत्त प्रसारित होताच प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन काम सुरू केल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून, हे काम लवकरात लवकर आणि दर्जेदारपणे पूर्ण करावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.


ताजी बातमी

View all

India vs New Zealand fourth ODI match where New Zealand defeated India by 244 runs.
भारताचा २४४ धावांनी लाजिरवाणा पराभव! रोहित, विराट आणि श्रेयस शून्यावर बाद
November 13, 2026
TVS NTORQ 150 scooter in the newly introduced Spectral Green colour
TVS NTORQ 150 च्या चाहत्यांसाठी खुशखबर! नवीन 'स्पेक्ट्रल ग्रीन' कलर लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
November 13, 2026
Crystal Crop Protection IPO details including issue size, price band and opening date.
Upcoming IPO : शेअर बाजारात येतोय कृषी क्षेत्रातील मोठा IPO! 'या' तारखेपासून गुंतवणुकीची संधी; जाणून घ्या सविस्तर
November 13, 2026
Amitabh Bachchan returns to the sets of Kaun Banega Crorepati 18 after recovering from seasonal flu.
KBC 18 Season : 'कौन बनेगा करोडपती १८'च्या सेटवर अमिताभ बच्चन यांचा दमदार कमबॅक
November 13, 2026
संबंधित बातम्या

View all

Mumbai Goa Highway Accident : अंजणारी पुलावर लक्झरी बसला ट्रकची दुहेरी धडक
November 13, 2026
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#
Kankavli News : कोकण रेल्वेचे ध्यासस्वप्न मधू दंडवतेंनी सत्यात उतरवले
November 13, 2026
Uday Samant announces Janajatiya Gaurav Diwas Seva Saptah programmes for tribal communities in Ratnagiri
‘जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताह’ तळागाळातील आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवा
November 12, 2026
Devgarh BJP members celebrate Palawarachi Diwali 2026 with the Katkari community at Munge village
मुणगे कातकरी वस्तीवर रंगली पालावरची दिवाळी
November 12, 2026