सातारा : साता-यात व्हेलमाशाच्या उल्टीची तस्करी करणा-या ४ जणांना सातारा स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. या कारवाईत एलसीबीने ५ कोटी ४३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 च्या सर्व्हिस रोडवर एका वाहनाच्या शोरूम समोर चार जण व्हेल माशाची उलटी सदृश्य पदार्थ विक्री करण्यासाठी रुग्णवाहिकेतून येणार असल्याची माहिती एलसीबीच्या अधिका-यांना मिळाली. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने घटनास्थळापासून नजीक सापळा लावला. एक रुग्णवाहिका पुण्याच्या दिशेच्या बाजूने सर्व्हिस रोडने साताराकडे येताना पथकास दिसली. त्यास पथकाने थांबून त्याची तपासणी केली.
रुग्णवाहिकेत एका पिशवीमध्ये एक काळपट पिवळसर रंगाचा ओबडधोबड आकाराचा पदार्थ मिळून आला. त्याची वन अधिकारी यांनी प्राथमिक तपासणी करून तो पदार्थ व्हेल माशाची उलटी सदृश्यपदार्थ असून तो प्रतिबंधित आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रति किलो एक कोटी रुपये किंमत असल्याचे सांगितले. रुग्णवाहिकेतील चाैघांना एलसीबाने ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा नोंदवून अटक केली.
ही कारवाई सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, रवींद्र मोरे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे ,मदन फाळके, मधुकर गुरव, पोलीस अमलदार उत्तम दाभाडे, सुधीर बनकर, अतिश घाडगे, संतोष पवार, विजय कांबळे, संजय शिर्के, संतोष सपकाळ, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रवीण फडतरे ,निलेश काटकर, अजित कर्णे, अमित सपकाळ, प्रमोद सावंत, गणेश कापरे, विक्रम पिसाळ, विशाल पवार, मोहन पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव ,प्रवीण पवार, मयूर देशमुख, वनविभागाकडील निवृत्ती चव्हाण वनक्षेत्र अधिकारी सातारा कुशल पवारा वनपाल सातारा राजकुमार मोसलगी वनरक्षक सातारा यांनी केली.