LIVE UPDATES

Kochi Mini Cooper Accident : भरधाव मिनी कूपरच्या धडकेत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

चालक मद्यधुंद असल्याचे तपासात उघड
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 12, 2026 12:35 PM
views 46  views

नवी दिल्ली : केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यात कोची विमानतळाजवळील नेडुंबासेरी भागात एका कारने स्कूटरला टक्कर दिल्याने दुर्दैवी अपघात घडला. भरधाव वेगाने जाणाऱ्या 'मिनी कूपर' कारची स्कूटरला धडक बसल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. हे विद्यार्थी जवळच्याच एका दुकानात चहा पिऊन घरी परतत होते.

मृतांमध्ये वायनाड येथील देविका, पालक्काड येथील गोपिका आणि कर्नाटकातील एजाज यांचा समावेश आहे. हे तिघेही त्रिक्काकारा येथे काम करत होते. पोलिसांनी कारचालक सुहेल सजीव याला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, कूपर चालकाचे नाव संशयित सुहेल सजीव असे आहे. अपघातानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. यावेळी तिथे जमलेल्या लोकांशी बोलताना त्याने, "माझे वडील सर्व काही सांभाळतील," असा दावा केल्याचे समजते. सुहेल हा अलाप्पुझा आणि कोची येथे कार्यरत असलेल्या 'आयएच डिझाइन्स' (IH Designs) या मोठ्या कापड व्यवसायाच्या मालकाचा मुलगा असल्याचे सांगितले स्थानिकांनी सांगितले. कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या एका मित्राला आणण्यासाठी अथाणीला जात असताना हा अपघात घडला.

पोलिसांनी संशयित सुहेलविरुद्ध 'भारतीय न्याय संहिता' (BNS) च्या कलम १०५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर त्याला त्वरित ताब्यात घेण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, वैद्यकीय तपासणीत चालक मद्यपान केलेल्या अवस्थेत असल्याचे निष्पन्न झाले. तपास अधिकारी अपघातापूर्वीच्या त्याच्या हालचालींचीही चौकशी करत आहेत. यामध्ये शनिवारी त्याने कोचीमधील अनेक पंचतारांकित हॉटेलना भेट दिली होती. अशी माहिती समोर आली आहे.