
कराची : पाकिस्तान पुन्हा एकदा मोठ्या अशांततेच्या गर्तेत सापडला आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेची मागणी करणाऱ्या जनतेच्या तीव्र रोषानंतर पाकिस्तान सरकारने खैबर पख्तुनख्वामध्ये आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सरकारच्या सल्ल्यानुसार राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी रविवारी ही आणीबाणी लागू केली आणि 'पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ' या खान यांचा पक्षाच्या नेतृत्वाखालील प्रांतीय सरकार बरखास्त केले. या प्रांतात लष्कर तैनात करण्यात आले असून मोठ्या संख्येने नेत्यांना ताब्यात घेतले जात आहे.
विशेष म्हणजे, प्रांताचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. खान यांच्या सुटकेसाठी दबाव आणण्याच्या उद्देशाने पीटीआय गेल्या काही दिवसांपासून रॅलींचे आयोजन करत आहे आणि राजधानी इस्लामाबादच्या दिशेने कूच करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
पक्षाचे प्रवक्ते झुल्फिकार बुखारी यांनी म्हटले आहे की, "आणीबाणीच्या नावाखाली केलेला हा सत्तापालटच आहे." या निर्णयामुळे देशात आणखी रक्तपात आणि अस्थिरता निर्माण होईल, असा इशाराही त्यांनी दिला. प्रस्तावित कूच करण्यापूर्वीच प्रशासनाने इम्रान खान यांच्या तीन बहिणींना आणि शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










