नवी दिल्ली : भारतीय विद्यार्थ्यांची कॅनडात हत्या करण्यात आली. भारत सरकारने याबाबत चौकशीची मागणी केली आहे. कॅनडामध्ये तीन भारतीय विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आल्यानंतर भारत आणि कॅनडामधील संबंधांमध्ये तणाव आणखी वाढला आहे. भारताने कॅनडाच्या सरकारकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. तसंच तेथील भारतीय नागरिकांवर होणाऱ्या सततच्या वाढत्या हल्ल्यांबाबतही सतर्कतेचा इशारा दिला आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी याबाबत बोलताना सांगितलं, की कॅनडातील तीन भारतीय विद्यार्थ्यांची नुकतीच जी हत्या करण्यात आली, ती एक भयंकर शोकांतिका आहे. भारतीय उच्चायुक्तालय आणि दूतावास या प्रकरणाची कॅनडाच्या अधिकाऱ्यांकडे संपूर्ण चौकशी करण्याची मागणी करत आहेत.