
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीच्या वैद्यकीय अधिक्षकपदी डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेली दोन वर्ष ते या ठिकाणी प्रभारी म्हणून काम पाहत होते. अखेर त्यांना या खुर्चीचा पदभार पूर्णपणे देण्यात आला आहे.
ते जिल्ह्यात गेली अनेक वर्ष वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. स्त्रीरोग व प्रसुतीतज्ञ म्हणून त्यांनी गोरगरीबांना न्याय देण्याच काम केल. २०२३ पासून ते उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांची वैद्यकीय अधिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. शासनाकडून याची ऑर्डर त्यांना पाठविण्यात आली आहे. या निवडीनंतर डॉ. ऐवळेंच सर्व स्तरातून अभिनंदन होत असून कौतुकाचा वर्षाव होत आहे.











