मध्य अरबी समुद्र आणि लगतच्या दक्षिण अरबी समुद्राच्या भागात समुद्रामध्ये उच्च ते खूप उंच लाटा तयार होण्याची शक्यता आहे आणि मध्य आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावर ८ जूनच्या संध्याकाळपासून खूप उंच लाटा तयार होण्याची शक्यता आहे. नैऋत्य अरबी समुद्रावर, कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र किनार्यालगत आणि जवळ समुद्राची स्थिती खवळलेली (Rough)असण्याची शक्यता आहे.
दिनांक ९ जून: मध्य अरबी समुद्रात समुद्रात खूप उंच लाटा तयार होण्याची शक्यता शक्यता आहे आणि त्याच भागात दिनांक ९ जूनच्या संध्याकाळपासून अभूतपूर्व अशा लाटा तयार होण्याची शक्यता आहे. दक्षिण अरबी समुद्राच्या लगतच्या भागांमध्ये आणि कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र किनार्यालगतच्या भागांमध्ये समुद्राची स्थिती खवळलेली (Rough) राहण्याची शक्यता आहे.
दिनांक १० जून: मध्य अरबी समुद्रात समुद्राची स्थिती अभूतपूर्व असण्याची शक्यता आहे. उत्तर आणि दक्षिण अरबी समुद्राच्या लगतच्या भागात आणि कर्नाटक-गोवा-महाराष्ट्र किनार्यालगतच्या भागात समुद्राची स्थिती उग्र (Rough) राहण्याची शक्यता आहे.