बिपरजॉय चक्रीवादळाची अशी आहे स्थिती..?

Edited by:
Published on: June 07, 2023 10:56 AM
views 286  views

पूर्वमध्य आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रात असणारे चक्रीवादळ "बिपरजॉय" ("बिपरजॉय" म्हणून उच्चारले जाते) मागील ३ तासांमध्ये जवळजवळ स्थिर होते आणि ०७ जून २०२३ रोजी पहाटे ०२:३० वाजता १२.५ ° उत्तर अक्षांश आणि ६६.० पूर्व रेखांशा दरम्यान प्रदेशात मध्यभागी रेंगाळत आहे, सदर चक्रीवादळ गोव्याच्या पश्चिमोत्तर-नैऋत्येस सुमारे ९०० किमी, मुंबईच्या नैऋत्येस १०२० किमी, पोरबंदरच्या दक्षिणोत्तर-नैऋत्येस १०९० किमी आणि कराचीच्या दक्षिणेस १३८० किमी.

सदर चक्रीवादळ जवळपास उत्तरेकडे सरकण्याची आणि पुढील ०६ तासांत पूर्वमध्य अरबी समुद्रावरील *तीव्र स्वरूपाच्या चक्रीवादळात* आणि त्यानंतरच्या २४ तासांत त्याच प्रदेशात *अतिशय तीव्र स्वरूपाच्या चक्रीवादळात* रूपांतरित होण्याची शक्यता आहे.