पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरवातीला गोव्यातील पोर्तुगिजांनी उध्वस्थ केलेल्या मंदिरांच्या पूनर्निमानाची घोषणा केली होती. घोषणेप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी आर्थीक तरतूदही केली आहे. सरकार दरबारी नोंद असलेल्या वास्तुची सरकार पुनर्बांधणी करणार आहेच, पण आता सरकारने लोकांकडून व संस्थांकडून त्याबाबची माहिती मागवली आहे.
आता सरकारच्या पुरातत्व खात्याने राज्यातील नागरिकांकडून त्याचप्रमाणे एनजीओ आणि संस्थांकडून पोर्तुगिज शासकांनी उध्वस्थ केलेल्या ऐतिहासीक स्थळांची किंवा गोव्यावर पोर्तुगीज राजवटीचा अंमल असतानाच्या काळात नष्ट केल्या गेलेल्या ऐतिहासीक स्थळांविषयी निवेदन मागवली आहेत. ही निवेदने संबंधीत कागदपत्रे, छायाचित्रे इत्यादीसह पुराव्यादाखल संचालक, पुरातत्व खाते, मळा पणजी गोवा यांच्याकडे टपालाने किंवा इमेल व्दारे ३१ नोव्हेंबर २०२२ पर्यत सादर करण्यास सांगितलं आहे. तशी जाहिरात खात्याकडून विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलीय.