नवी दिल्ली : चांद्रयान ३ अवकाशात झेपावलं त्यावेळी झालेल्या काऊंटडाऊनला ज्या महिला शास्त्रज्ञाचा आवाज लाभला होता, त्यांचे निधन झाले आहे. एन. वलरमथी असं त्यांचं नाव असून हृदयविकाराच्या झटक्याने शनिवारी रात्री त्यांचं निधन झालं. इस्रोच्या अनेक प्रकल्पांच्या उड्डाणांच्या काऊंटडाऊनला एन. वलरमथी यांचा आवाज लाभला होता. हाच आवाज आता अवकाशात विसावला आहे. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.