वंदे भारतचा शुभारंभ महाराष्ट्र - गोव्याच्या पर्यटनाला चालना देणारा ठरणार

रवींद्र चव्हाण यांचं प्रतिपादन
Edited by: विनायक गावस
Published on: June 27, 2023 14:02 PM
views 329  views

मडगाव : महाराष्ट्र आणि गोव्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. वंदे भारत शुभारंभाचा हा ऐतिहासिक क्षण देशाच्या प्रगतीला पूरक ठरणारा व या दोन राज्यांच्या पर्यटनाला आणखी चालना देणारा ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांचे हे स्वप्न पूर्ण केले केले असून देशाला गतिमान करणारी रेल्वेतील ही क्रांती आहे. व ही क्रांती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुळे शक्य झाली आहे असे उद्गगार महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काढले. गोव्याचे मुख्यमंत्री म्हणाले पर्यटका बरोबरच सर्वसामान्य नागरिकांची लाईफ लाईन असलेली रेल्वे आणखी मजबूत झाली आहे देशातील देशातील दळण वळणाचे साधन आणखी गतिमान झाले आहे! मडगाव रेल्वे स्थानकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सवर हिरवा झेंडा दाखवा वंदे भारतचा शुभारंभ करत देशभरातील नागरिकांना ही आलिशान हायस्पीड ट्रेन खुली केली


मडगांव रेल्वे स्थानकामध्ये हा लोकार्पणाचा ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला. गोवा राज्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई, गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत,केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मडगाव रेल्वे स्थानकावर उपस्थित राहत या ऐतिहासिक सोहळात सहभाग घेतला.गोवा राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खौटे, मडगांवचे आमदार दिगंबर कामत, राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर, कोकण रेल्वे चे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता गोवा व महाराष्ट्र राज्याचे अधिकारी रेल्वेचे अधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोव्यातील नागरिकांनी या सोहळ्यात उस्फूर्त सहभाग घेतला.

वंदे भारत या ट्रेन मध्ये ८ बोगी (डब्बे) मध्ये एकुण ५३० सीट (आसन व्यवस्था) आहेत.त्यामध्ये १ बोगी एक्झिक्युटिव्ह व अन्य ७ बोगी चेअर कारचे आहेत.यामध्ये एक्झिक्युटिव्ह बोगीतील तिकीट दर ३३६० रुपये तर चेअर कार मधील तिकीट दर १८१५ रुपये आहे. मडगाव मुंबई अशी शुभारंभ सफर सुरू झाली आहे. भडगाव नंतर ती करमळी नंतर थीवीम नंतर कणकवली नंतर रत्नागिरी स्थानकावर लोकप्रतिनिधी व नागरिक या शुभारंभी ट्रेन चे स्वागत करणार आहेत. धारवाड तें बंगलूर, रांची तें पाटणा, रांची कमलापती तें इंदोर व रांची तें जबलपूर या एकूण पाच रेल्वे मार्गावर ही शुभारंभ ट्रेन मार्गस्थ झाल्या! शुभारंभ ट्रेनमधून नागरिक पत्रकार व लोकप्रतिनिधी यांनी आलिशान व सुखद रेल्वे सफारीचा आनंद घेतला