गुजरात : मोरबीमध्ये मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळल्यानं आतापर्यंत 140 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. प्रशासनाकडून मदतकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पुलाची क्षमता केवळ 100 लोकांचीच आहे. मात्र दुर्घटना घडली त्यावेळी या पुलावर तब्बल 300 ते 400 जण उपस्थित होते. पूल कोसळल्यानं शेकडो लोक नदीत बुडाले आहेत.
अशातच यासंदर्भात आणखी एक माहिती समोर येत आहे. गुजरातमधील खासदार मोहन कुंदारिया यांच्या नातेवाईकांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. कुंदरिया यांचे तब्बल 12 नातेवाईक या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडले असून बहिणीच्या सासरच्या मंडळींचा समावेश आहे.