संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे निलंबित !

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 19, 2023 12:58 PM
views 700  views

नवी दिल्ली : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आलं आहे.सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह 46 खासदारांचं निलंबन करण्यात आल आहे. 

संसदेचं सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असून विरोधकांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. लोकसभेतून आज 49 खासदारांना निलंबित करण्यात आलं असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे सोमवारी लोकसभेतील 33 आणि राज्यसभेतील 45 अशा एकूण 78 खासदारांवर करण्यात आली होती. आतापर्यंत अधिवेशनात एकूण 141 खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे.