डॉ.तानाजीराव चोरगे महाविद्यालयात क्रीडा स्पर्धा उत्साहात

Edited by: मनोज पवार
Published on: December 19, 2024 18:27 PM
views 76  views

चिपळूण : कृषिभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित डॉ.तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालयात दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. संस्थेचे संस्थापक कृषिभूषण डॉ.तानाजीराव चोरगे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. या कार्यक्रमासाठी  संस्थेच्या संचालिका तसेच वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या अंजलीताई चोरगे, संस्थेचे संचालक खापले सर,स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य पाटील सर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संकेत कदम सर व सर्व घटक महाविद्यालयाचे प्राचार्य ,प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी क्रीडा शपथ सामुदायिकरित्या  घेतली.यानंतर संस्थेचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.तानाजीराव चोरगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित अध्यक्ष महोदयांचे स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्या अंजलीताई चोरगे यांनी पुष्गुच्छ देऊन केले. तसेच उपस्थित संस्था संचालकांचे व घटक महविद्यायचे प्राचार्य यांचे स्वागत प्रा. येलये सर यांनी पुष्प देऊन केले.

अध्यक्षांनी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व समजावून सांगितले तसेच अनेक उदाहरणे देऊन बहुमोल असे मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन संस्थेचे क्रीडाशिक्षक प्रा.बोकडे सर यांनी सुत्रसंचालन केले. महाविद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी विक्की मोहिते यांच्या आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली.